ठाणे

आय.टी.आय. प्रवेश सत्र २०२१ साठी ऑनलाईन फॉर्म सुरु – औद्योगिक प्रशिक्षण संस्था, अंबरनाथने दिली माहिती

अंबरनाथ दि. ०९ (नवाज अब्दुलसत्तार वणू) : आय. टी. आय. प्रवेश सत्र २०२१ साठीची प्रवेश प्रक्रिया दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर सुरु झालेली आहे. उमेदवारांच्या दहावीच्या प्राप्त गुणांच्या आधारे केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रणालीतून हे प्रवेश करण्यात येतात. प्रवेशासंबंधीचे नियम, आवश्यक कागदपत्रांची माहिती व प्रवेश कार्यपद्धती पुस्तिका   https://admission.dvet.gov.in आणि www.itiambarnath.gov.in  या संकेतस्थळावर उपलब्ध असून प्रवेश फेऱ्यांचे वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येईल. अशी माहिती औद्योगिक प्रशिक्षण संस्था अंबरनाथचे प्राचार्य अजित शिंदे यांनी एका पत्रकाद्वारे दिली आहे.
           

 अंबरनाथ पश्चिमेकडील कल्याण-बदलापूर राज्य महामार्गालगत असलेली शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, अंबरनाथ ही ठाणे जिल्हास्तरीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था आहे. सदरची संस्था महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विकास या खात्यांतर्गत व व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय मुंबई -०१ यांच्या अधिपत्याखाली कार्यरत आहे. संस्थेत एकूण विविध २९ ट्रेड (व्यवसाय) असून त्यापैकी प्रवेशसत्र सन २०२१-२०२२ करीता एकूण २७ व्यवसायांच्या ५० तुकड्यांमध्ये प्रवेशासाठी एकूण १०८४ जागा उपलब्ध आहेत. प्रवेशासाठी उपलब्ध २७ ट्रेड पैकी २० ट्रेडसाठीचे दहावी उत्तीर्ण, तर ०७ ट्रेडसाठी दहावी उत्तीर्ण किंवा अनुत्तीर्ण अशी शैक्षणिक अर्हता आहे. संस्थेतील सर्व कोर्सेस रोजगार व स्वयंरोजगारक्षम आहेत.

कौशल्य प्रशिक्षणाचे महत्व वाढले असून औद्योगिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर प्रशिक्षित मनुष्यबळाची मागणी आहे, ही बाब विचारात घेता उमेदवारांनी संस्थेच्या प्रवेशप्रक्रियेत सहभागी व्हावे.  संस्थेत येणाऱ्या प्रवेशेच्छुक विद्यार्थी व पालक यांना संस्थेत मार्गदर्शन केले जाते. अशी माहिती औद्योगिक प्रशिक्षण संस्था, अंबरनाथचे प्राचार्य अजित शिंदे यांनी दिली आहे.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!