ठाणे

खासदार कपिल पाटील यांचा सत्कार

अंबरनाथ दि. १९ (नवाज वणू)   :  केंद्रीय मंत्रिमंडळात नव्याने स्थान मिळालेल्या राज्यातील चार नेत्यांनी मंत्रिमंडळाचा पदभार स्वीकारला आहे. यानंतर हे मंत्री आता महाराष्ट्रात जन आशीर्वाद यात्रा करत आहेत. चारपैकी खासदार कपिल पाटील यांच्या जन आशीर्वाद यात्रेला सुरुवात झाली आहे. बुधवारी ते अंबरनाथला भेटीसाठी आले होते.

या भेटीदरम्यान खासदार कपिल पाटील यांना भारतीय जनता पक्षाचे साउथ इंडियन सेलचे अंबरनाथ शहर उपाध्यक्ष व्ही. तंगराज नाडार व वार्ड क्रमांक ३० चे अध्यक्ष सुंदर पेरूमल यांनी त्यांना भेटवस्तू देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश सचिव गुलाबराव करंजुले पाटील, अंबरनाथ शहराध्यक्ष अभिजीत करंजुले पाटील, रामन वैती आदी पदाधिकारी उपस्थित होते.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

मुंबई

error: Content is protected !!