ठाणे

महिन्यातून एकदा महिलांसाठी विशेष लसीकरण मोहीम..

ठाणे (प्रतिनिधी: अवधुत सावंत) : प्रत्येक महिन्याच्या चौथ्या आठवड्यातील एक दिवस ‘पार्किंग प्लाझा’ येथे महिलांसाठी विशेष लसीकरण मोहिम राबविण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. शहरात आतापर्यंत झालेल्या एकूण लसीकरणामध्ये महिलांची संख्या कमी असल्यामुळे पालिकेने हा निर्णय घेतला असून या उपक्रमाची सुरूवात येत्या सोमवारपासून करण्यात येणार आहे.

ठाणे महापालिकेने आजपर्यंत ९ लाख लसीकरणाचा टप्पा पार केला आहे.त्यामध्ये ४ लाख ७७ हजार ५५० पुरूषांचे तर ४ लाख २३ हजार ४८८ महिलांचे लसीकरण झाले आहे. महिलांसाठी विशेष लसीकरण मोहिम राबविण्याचा निर्णय महापौर नरेश म्हस्के आणि आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी घेतला आहे. या निर्णयानुसार प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात एक दिवस ‘पार्किंग प्लाझा’ येथे महिलांसाठी विशेष लसीकरण शिबिर आयोजित असणार आहे.

सेना – मनसे श्रेयवाद

ठाणे शहरातील महिलांसाठी विशेष लसीकरण शिबिर आयोजित करण्याची मागणी १८ ऑगस्ट रोजी पालिकेकडे केली गेली होती. त्यांनतर महापौरांनी महिलांसाठी विशेष लसीकरण शिबिराची घोषणा केली, असा दावा मनसे च्या महिला ठाणे शहराध्यक्ष समिषा मार्कंडे यांनी केला आहे. ही घोषणा म्हणजे मनसे चे श्रेय लाटण्याचा उद्योग महापौरांनी केला. परंतु या घोषणेचे श्रेय फक्त आणि फक्त मनसे ला आहे, असे त्यांनी म्हटले आहे.


YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

मुंबई

error: Content is protected !!