ठाणे

ठाणे महापालिकेचा 10 लाख उच्चांकी लसीकरणाचा टप्पा पूर्ण – महापौर व आयुक्तांची माहिती

ठाणे (1 सप्टें, संतोष पडवळ ) : केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार शहरात सुरु असलेल्या लसीकरण मोहिमेंतर्गत ठाणे महापालिकेने आजपर्यंत 4,70,289 महिला व 5,30325 पुरूष असा एकूण 10 लाख 614 उच्चांकी कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा महत्वपूर्ण टप्पा पूर्ण पार केला असल्याची माहिती महापौर नरेश गणपत म्हस्के आणि महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी दिली.

कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी तयार करण्यात आलेल्या कोविशिल्ड व कोवक्सिन लसीचा डोस शासनाने दिलेल्या मार्गदर्शनानुसार देण्याचे काम महापालिका प्रशासनाच्यावतीने सुरू आहे. शासनाकडून उपलब्ध होणाऱ्या लसीकरण साठ्यानुसार महापालिका तसेच खासगी हॉस्पिटलमध्ये नागरिकांना पाहिला व दुसरा डोस देण्यात येत आहे.

 ठाणे शहरात आतापर्यंत 24019 आरोग्य कर्मचाऱ्यांना पहिला तर 15,782 कर्मचाऱ्यांना दुसरा डोस देण्यात आला आहे.  फ्रंट लाइन कर्मचारी पैकी 27,290 लाभार्थ्यांना पहिला व  13,870 लाभार्थ्यांना दुसरा डोस देण्यात आला असून ४५ ते ६० वयोगटातंर्गत 1,80,114 लाभार्थ्यांना पहिला तर 1,16240 लाभार्थ्यांना दुसरा डोस देण्यात आला आहे. ६० वर्षावरील नागरिकांमध्ये 1,37,769 लाभार्थ्यांना पहिला डोस व 82,005 लाभार्थ्यांना दुसरा डोस तसेच 18 ते 44 वयोगटातील नागरिकांमध्ये 3,49,598 लाभार्थ्यांना पहिला डोस तर 53,927 लाभार्थ्यांना दुसरा डोस देण्यात आला आहे. दरम्यान शहरातील 395 गर्भवती महिलांचे, 43 स्तनदा मातांचे, 411 तृतीय पंथाचे आणि अंथरुणाला खिळून पडलेल्या 17 व्यक्तींचे देखील कोरोना प्रतिबंधक लसीकरण पूर्ण करण्यात आले आहे.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

मुंबई

error: Content is protected !!