ठाणे

राजेश कदम यांची शिवसेना कल्याण डोंबिवली क्षेत्राच्या उपजिल्हाप्रमुख पदावर नेमणूक

डोंबिवली (  शंकर जाधव ) : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार तसेच पालकमंत्री एकनाथ शिंदे, जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे तसेच खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या आशीर्वादाने कल्याण डोंबिवली क्षेत्राच्या उपजिल्हा प्रमुख ह्या पदावर नेमणूक करण्यात आली आहे.

या प्रमुख पदावर नेमणूक केल्याबद्दल राजेश कदम यांनी समस्त शिवसेना परिवाराचे मनापासून आभार मानले असून या पदाला मी योग्य न्याय देऊन डोंबिवली शहरासाठी  नागरिकांच्या सोयी सुविधांसाठी तसेच त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी अविरत कष्ट घेईन असे वक्तव्य केले आहे. कदम यांची उपजिल्हाप्रमुखपदी नेमणूक झाल्याने त्याचे शहरात अभिनंदन होत आहे.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!