ठाणे

पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे आणि आठ नगरसेवक यांच्या तर्फे दिव्यातून मोफत गणपतीसाठी गाड्या सोडल्या

दिवा (बातमीदार) : आज संध्याकाळी दिव्यातून पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे आणि आठ नगरसेवक यांच्या तर्फे गणपतीसाठी मोफत गाड्या सोडण्यात आल्या. 

गेल्या वर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव जास्त असल्याने प्रत्येक चाकरमानी गावी गेला नव्हता. त्या सर्वांनी घरच्या बाप्पाला मुंबईतून हात जोडले होते. पण यावर्षी कोरोनाचे रुग्ण कमी झाल्याने कोकणात गावी जाण्यासाठीचे नियम शिथिल केल्यामुळे चाकरमानी गावी निघाले. 

आगामी येणाऱ्या पालिकेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन शिवसेनेचे पालकमंत्री, खासदार आणि आठ नगरसेवक यांनी आपल्या मतदारांसाठी 24 गाड्या कोकणातील चाकरमान्यांसाठी गणपतीला गावी जाण्यासाठी मोफत ठेवल्या. महाड, खेड, खारेपाटण, दापोली, माणगाव, चिपळूण, संगमेश्वर, रत्नागिरी, मालवण, कणकवली, कुडाळ, सावंतवाडी अशा 12 ठिकाणच्या गाड्या सोडण्यात आल्या. त्यावेळी प्रवाशांशी खासदार श्रीकांत शिंदे यांनी संवाद साधला. तर माजी उपमहापौर रमकांत मढवी यांनी सर्व गाड्यांना झेंडा दाखवला.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

मुंबई

error: Content is protected !!