ठाणे

कोपर पुलावर पहिला खड्डा ; मनसेचे आमदाराचे पालिका प्रशासनावर तशोरे..

 डोंबिवली ( शंकर जाधव ) : तब्बल दोन वर्षाच्या प्रतीक्षेनंतरडोंबिवली पूर्व पश्चिम जोडणाऱ्या कोपर पुल ७ सप्टेंबर रोजी वाहतुकीसाठी खुला झाला. मात्र दोन दिवसांत पुलावर खड्डा पडल्याने प्रशासनाने एवढी घाई करत पूल का सुरु केला असा प्रश्न मनसेने प्रश्न उपस्थित केला.मनसे आमदार प्रमोद ( राजू ) पाटील यांनी मंगळवारी पुलावरील खड्ड्यांची पाहणी केली.आमदार पाटील यांनी पूलावर ४८ तासाच्या आता खड्डे पडल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले.

   कोपर पुल वाहतुकीसाठी सुरु झाल्याने एकीकडे डोंबिवलीकर खुश झाले असताना दोन दुसरीकडे दोन दिवसातच पुलावर खड्डे पडल्याने पालिका प्रशासनाच्या कामावर नाराजी व्यक्त केली आहे.मनसे आमदार प्रमोद ( राजू ) पाटील, जिल्हाध्यक्ष प्रकाश भोईर,मनसे डोंबिवली शहरअध्यक्ष मनोज घरत यांसह संदीप ( राजू ) पाटील,विद्यार्थी सेना शहर अध्यक्ष मिलिंद म्हात्रे, उपशहर अध्यक्ष दिप्तेश नाईक, प्रीतेश म्हामुणकर, मनविसे उपशहर अध्यक्ष परेश भोईर आदि उपस्थित होते. यावेळी पालिकेचे कार्यकारी अभियंता तरून जुनेजा हेही पाहणीच्या वेळी आल्याने आमदार पाटील यांनी त्यांना पालिकेच्या कामकाजाबाबत चांगलेच सुनावले. यावेळी आमदार पाटील म्हणाले,      उद्घाटनानंतर ४८ तास होण्या आधीच खड्डा पडल्याने नागरिकांनी वाहनचालकांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली असून याप्रकरणी मनसे आमदार प्रमोद पाटील म्हणाले, ज्या तत्परतेने नव्या पुलावरील खड्डा बुजविला गेला त्याच तत्परतेने गणेशोत्सव काळात नागरिकांना दिलासा देण्यासाठी शहरातील रस्त्यावरील खड्डे बुजवावेत अशी मागणी केली आहे. कोपर पुलावर पडलेल्या खड्ड्याची मनसे आमदार पाटील यांनी पाहणी केली यानंतर त्यांनी प्रशासनाने गणेशोत्सवापूर्वी कोपर पूल सुरु करून नागरिकांना दिलासा द्यावा हि आपली देखील मागणी होती. मात्र कोपर पुलावर टाकण्यात आलेल्या डांबरीकर्णाच्या दर्जाचा या पुलावर ४८ तासाच्या आत खड्डा पडल्याने अंदाज येत आहे. प्रशासनाने उघडीप मिळताच आवश्यक तो डंबराचा थर देणे गरजेचे होते मात्र तसे न केल्याने हा खड्डा पडल्याचे प्रशासनाचे म्हणणे असून हा खड्डा ज्या तत्परतेने प्रशासनाने बुजवला तीच तत्परता इतर रस्त्यावरील खड्ड्याबाबत देखील दाखवावी अशी अपेक्षा व्यक्त करताना प्रशासनाने करोना काळात देखील रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी ठेवलेल्या १७ कोटीच्या निधीतून इतर रस्त्यावरील खड्डे बुजवून नागरिकांना गणेशोत्सव काळात दिलासा द्यावा अशी मागणी केली आहे.

 `नेहमीप्रमाणे करून दाखवले`…

    कोपर पुलावरील खड्डा समाजिक माध्यमावर गाजला…

कोपर पुला सुरु झाल्याने ज्या ज्या नागरिकांनी आनंद व्यक्त केला त्यासह अनेकांनी कोपर पुलावर पडलेल्या खड्डयाचा फोटो फेसबुक, व्हाटसअपवर वर प्रचंड गाजर आहे. `नेहमीप्रमाणे करून दाखवले`, `डोंबिवली मधील कोपर ब्रिज वरील पहिल्या खड्ड्याचे सगळ्याना शुभेच्छा`, डोंबिवली मधील कोपर ब्रिज वरील पहिल्या खड्ड्याचे सगळ्याना शुभेच्छा……अशी खिल्ली मनसैनिकांनी समाजिक मध्यामांवर उडवली आहे.तर डोंबिवलीकरांनो उत्सव साजरा करणार की उदघाटन मंत्री व खासदारांना प्रश्न विचारणार असेहि लिहिले आहे.    

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

मुंबई

error: Content is protected !!