ठाणे

गायक – संगीतकार प्रकाश येवारे यांचे निधन

डोंबिवली : गायक-संगीतकार प्रकाश शिवाजीराव येवारे यांचे आज पहाटे झोपेत निधन झाले. ते ५० वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, आई-वडील, दोन विवाहीत बंधू, एक विवाहीत बहिण, दोन पुतणे, दोन भाच्या, एक नात असा मोठा परिवार आहे.

    प्रकाश उत्तम,गायक, संगीतकार, संगीत शिक्षक होते. त्यांच्या हाताखाली संगिताचे धडे गिरविलेया अनेक तरुण तरुणींनी टी व्ही चॅनेल्सवरील विविध रियलिटी शोमध्ये गायनात आणि संगीतात घवघवीत यश मिळविले आहे. प्रकाश यांनी एक दोन मराठी मालिकांना देखील पार्श्वसंगीत  दिले होते. प्रकाशजी हे कलाकार म्हणून जितके मोठे होते तितकेच ते माणूस म्हणून मोठे होते. संगीत क्लासची फी भरण्याची क्षमता नसलेल्या अनेक कलाकारांना त्यांनी न कुरकुरता मोफत प्रशिक्षण दिले.

 आज दुपारी डोंबिवली येथील शिवमंदिर  स्मशानभूमित त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचे चिरंजीव यश यांनी त्यांच्या चित्तेला अग्नी दिला

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

मुंबई

error: Content is protected !!