गुन्हे वृत्त

पुणे विद्यापीठची बनावट प्रमाणपत्रं बनवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, तीन जण ताब्यात

पुणे, : पुणे विद्यापीठची बनावट प्रमाणपत्रं बनवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश कारण्यात आला असून या प्रकरणी नीरा येथे धाड टाकत तिघांना ताब्यात घेत त्यांच्यावर जेजूरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, स्थानिक गुन्हे शाखेच्या या दमदार कामगिरीमुळे बनावट प्रमाणपत्र आणि गुणपत्रिकांचा मोठा घोटाळा समोर आला आहे. गणेश संपत जावळे (रा. नीरा), मनोज धुमाळ (रा. नीरा) आणि वैभव लोणकर (रा. बारामती) या तिघांना या प्रकरणी अटक करण्यात आली आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि इतर महाविद्यालयांची बनावट प्रमाणपत्रे आणि गुणपत्रिका बनवून त्यांची विक्री केली जात असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप येळे यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी पुणे विद्यापीठाकडे याबाबत शहानिशा करून घेतली. त्यानंतर नीरा येथील समीक्षा प्रिंटिंग प्रेसमध्ये धाड टाकली असता त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बनावट प्रमाणपत्रे आणि गुणपत्रिका बनवण्याचे काम सुरू असल्याचे समोर आले. त्यांच्यावर जेजूरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आहे.


बनावट प्रमाणपत्राचा उपयोग केला त्यांच्यावरही कारवाई होणार
नीरा येथील बनावट प्रमाणपत्र बनवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झाल्यानंतर या टोळीचे बनावट प्रमाणपत्र बनवण्याचे काम ते किती दिवसांपासून करत होते ? तसेच हे प्रमाणपत्र आजपर्यंत किती जणांना दिली आहे. व त्यापासून कित्येकांनी या बनावट प्रमाणपत्रांच्या आधारे नोकरीसाठी, पुढील शिक्षणासाठी व बढतीसाठी, वेतनवाढीसाठी उपयोग केला आहे, हे तपासणे गरजेचे आहे. ज्याप्रमाणे बनावट प्रमाणपत्र बनवणारी जेवढे गुन्हेगार तेवढाच त्या बनावट प्रमाणपत्रांचा फसवणूक करून वापर करणाऱ्या व्यक्ती ही गुन्हेगार आहेत. त्यामुळे आता ज्यांनी या बनावट प्रमाणपत्राचा उपयोग केला आहे, त्यांच्यावरही कारवाई होणार का हे पाहणे आता औत्सुक्याचे ठरणार आहे.

About the author

Aapale Shahar News

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

मुंबई

error: Content is protected !!