ठाणे

दिव्यातील डम्पिंग बंद करण्याचे केवळ आश्वासन मिळत आहे – निलेश पाटील

ठाणे / दिवा, ( ता 28 सप्टें, संतोष पडवळ) : – आता केवळ दिव्यातील डम्पिंग ग्राउंड हटवण्याच्या घोषणा नकोत तर पालिकेतील सत्ताधारी पक्षाने प्रत्यक्ष कृती करावी.मागील अनेक वर्षे केवळ आश्वासने देण्याचे काम सत्ताधारी शिवसेना करत असल्याने दिवा वासीयांचा सेने वर भरोसा राहिला नाही असा टोला भाजपचे निलेश पाटील यांनी लगावला आहे.

डम्पिंग ग्राउंड हटवण्याच्या प्रश्नावर दिव्यात बॅनर बाजी सुरू झाल्यानंतर भाजपचे उपाध्यक्ष निलेश पाटील यांनीही आपली प्रतिक्रिया दिली आहे.दिवा शहरातील डम्पिंग ग्राउंड हटावे ही येथील प्रत्येक नागरिकांची भूमिका आहे. डम्पिंग च्या विषयावर राजकारण करून वेळ काढण्याची भूमिका सत्ताधारी सेनेने करू नये.जर तुम्हाला खरोखर डम्पिंग ग्राउंड बंद करायचे आहे तर ते बंद करून दाखवा राजकीय बॅनर बाजी कशाला असा सवाल निलेश पाटील यांनी विचारला आहे.

ठाणे महापालिका सत्ताधारी प्रत्येक निवडणूक च्या तोंडावर डम्पिंग बंद करणार म्हणून दिवावासियांना आश्वासन देत असतात.मागील तीनही निवडणुकांत येथील नागरिकांनी सत्ताधारी सेनेच्या भूलथापा ऐकल्या आहेत.प्रत्यक्ष कृती न करता केवळ आश्वासन मिळत असल्याने येथील जनतेला सेनेवर भरोसा राहिला नाही,त्यामुळे त्यांनी आधी डम्पिंग ग्राउंड बंद करून दाखवावे असे आव्हान निलेश पाटील यांनी दिले आहे.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

मुंबई

error: Content is protected !!