कोकण

खोपोलीमध्ये इंडिया स्टील कंपनीमध्ये स्फोट ; दोन जणांचा मृत्यू

खोपोली   :    रायगड जिल्ह्यातील खोपोलीमध्ये असलेल्या इंडिया स्टील कंपनीमध्ये मध्यरात्री स्फोट झाला. या स्फोटामध्ये दोन जणांचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाल्याचे समोर येत आहे. जखमीला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या स्फोटा मागाचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट असून या स्फोटामुळे अनेक घरांना हादरे जाणवले आहेत.
दरम्यान हा स्फोट भयंकर होतो. यामध्ये मृत्यू झालेल्या दोघांच्या शरीराचे तुकडे झालेत. यावरून स्फोटाची तीव्रता लक्षात येते. या स्फोटाचे अद्याप कारण समजले नसेल तरी गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. दिनेश वामनराव चव्हाण (वय ५५), प्रमोद दूधनाथ शर्मा (वय ३०) अशी मृतांची नावे आहेत. तर सुभाष धोडींबा वांजळे या स्फोटात गंभीर रित्या जखमी झाले आहेत.
मध्यरात्री १ वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली आहे. या कंपनीत भंगार मधील लोखंड वितळण्याचे काम केले जाते. याच कामासाठी वापरण्यात येणाऱ्या गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. यापूर्वी या कंपनीत दोन वेळा अशाच प्रकारची दुर्घटाना घडली आहे. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. काल झालेल्या दुर्घटनेमधील गंभीर जखमीला नवी मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!