नवी मुंबई

नवी मुंबई पोलीस आयुक्तालय आणि परिवहन विभाग पनवेल यांच्यावतीने पनवेलमधील धर्मेश धनेशा यांचा सन्मान

पनवेल : प्रतिनिधि (संतोष पडवळ ) रास्ता सुरक्षा सप्ताहाच्या कार्यकाळात आयोजित रन फॉर रोड सेफ्टी या कार्यक्रमासह इतर कार्यक्रमात आपल्या नामांकित कंपनीचे पिण्याच्या पाण्याचे सीलबंद बाटली द्वारे पाणी वाटप करून संपूर्ण पाण्याचे वाटप केल्यामुळे आदित्य इडस्ट्रीजचे मालक धर्मेश धनेशा यांचा कळंबोली येथील रस्ता सुरक्षा सप्ताहाच्या सांगता समारंभात प्रादेशिक परिवहन अधिकारी लक्ष्मण दराडे आणि नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचे वाहतूक शाखेचे उपायुक्त सुनील लोखंडे यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला.
यावेळी यांच्यासह उपप्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगीनी पाटील, कळंबोली वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक अंकुश खेडकर, पनवेल वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक अभिजित मोहिते, पनवेल परिवहन विभागाचे मोटार वाहन निरीक्षक प्रशांत शिंदे आदींसह इतर पोलीस अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. धर्मेश धनेशा हे आजपर्यंत सामाजिक कार्यात मोलाचा वाटा उचलत पाण्याचे वाटप करीत असतात. यामध्ये कोणत्याही प्रकारचा स्वार्थ दिसून येत नसतो. मात्र त्यांच्या याच निस्वार्थी कार्याची दखल नवी मुंबई पोलीस आयुक्तालय आणि परिवहन विभागाने घेतली असल्याचे यानिमित्ताने समोर आले आहे. त्यांच्या या कार्याचा गौरव करावा तितका कमी असल्याचे मत प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आले.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!