ठाणे

राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा काँग्रेसच्या उमेदवाराला समर्थन

 वेळ झाल्यामुळे अर्ज माघे घेता आला नाही
 
अंबरनाथ दि. ०८ (नवाज अब्दुलसत्तार वणू)
राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसमध्ये आघाडी असल्यामुळे मला माझा उमेदवारी अर्ज माघे घ्यायचा होता, पण वेळ झाल्यामुळे ते शक्य झाले नाही, परंतु, आता आम्ही एकत्रित आहोत आणि आघाडीच्या उमेदवाराला आमचे पूर्णपणे समर्थन राहील, असे स्पष्टीकरण राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार प्रवीण खरात यांनी सदाशिव पाटील यांच्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत केले आहे.
                राज्यातील विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे एकत्रितपणे निवडणूक लढवीत आहेत, असे असताना अंबरनाथ विधानसभा क्षेत्रासाठी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार रोहित साळवे यांच्या समोर राष्ट्रवादीचे प्रवीण खरात यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता, अपेक्षा होती की खरात हे शेवटच्या क्षणी आपला अर्ज माघे घेतील. परंतु तसे झाले नाही, म्हणून दोन्ही पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. अखेर मंगळवारी राष्ट्रवादीचे अंबरनाथ शहराध्यक्ष सदाशिव पाटील यांच्या कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या एका पत्रकार परिषदेत खरात यांनी वरील स्पष्टीकरण देत आपण सोबत आहोत आणि आघाडीचे अधिकृत उमेदवार रोहित साळवे यांना विजयी करण्यासाठी काम करणार असल्याचे जाहीर केले.
           दरम्यान ज्याने पक्षाच्या एबी फॉर्म वाटपमध्ये घोळ केला आहे. त्याच्यावर पक्षश्रेष्ठींनी कारवाई करावी. अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अंबरनाथ शहराध्यक्ष सदाशिव पाटील यांनी केली आहे.
            या पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अंबरनाथ शहराध्यक्ष सदाशिव पाटील, राष्ट्रवादी युवक जिल्हाध्यक्ष सचिन पाटील, १४० अंबरनाथ विधानसभा मतदार संघाचे आघाडीचे उमेदवार रोहित साळवे, प्रवीण खरात, नगरसेवक आनंद कन्नन, बळीराम साबे यांच्यासह अनेक मान्यवर, पदाधिकारी उपस्थित होते.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!