मुंबई दि 7 नोव्हेंबर : राज्यातील कोकण किनारपट्टीवरील मासेमारांवर आलेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे आपदग्रस्त झालेल्या मच्छीमारांना एकवीसशे (2100) कोटी रुपये सानुग्रह मदत द्यावी अशी मागणी कोळी महासंघाच्या वतीने केली असता त्यासाठी राज्यस्तरावर समिती गठीत करणार असल्याचा निर्णय मा राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी घोषित केला .
कोळी महासंघाचे अध्यक्ष आणि विधान परिषद सदस्य रमेश दादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली शिष्टमंडळाने राजभवन येथे राज्यपालांची भेट घेतली ,
त्यावेळी ते बोलत होते. या प्रसंगी कोळी महासंघाचे सरचिटणीस राजहंस टपके, कार्याध्यक्ष प्रकाश बोबडी, युवा अध्यक्ष अँड चेतन पाटील ,महिला अध्यक्षा राजश्री भानजी , विशाल पाटील, सचिन पागधरे ,मनीष पिकले आदी मान्यवर उपस्थित होते .
राज्यात 28 हजार मासेमारी नौका असून 20 हजार मच्छिमार नौका बंदरावरच परतत आल्या, या नैसर्गिक आपत्तीमुळे मोठ्या नुकसानीत आलेल्या आहेत,
मासेमारीवर झालेला खर्च, डिझेल , बर्फ, खलाशी या सयंत्रणेवर अवलंबून असणारा कष्टकरी समाजाला मोठा आर्थिक फटका बसला आहे
सहा सिलेंडर मासेमारी नौकेपासून एकेरी मासेमारी करणारा पारंपारिक मासेमार यांचे झालेले नुकसान लक्षात घेऊन त्यांना सानुग्रह मदत मिळावी यासाठी संपूर्ण कोकण किनारपट्टीवर कोळी महासंघाने आढावा घेतला होता , त्या अनुषंगाने एकवीसशे कोटी रुपयांची मदत मिळावी असे निवेदन राज्यपालांना केले,
याकरिता मच्छीमारांच्या प्रतिनिधींसह राज्यस्तरीय समिती गठीत करून मच्छीमारांना मदत आणि पुनर्वसन केले जाईल असे आश्वासन राज्यपालांनी यावेळी दिले.