भारत

राजधानीत पंडित जवाहरलाल नेहरू यांना अभिवादन

नवी दिल्ली, दि.14 : देशाचे प्रथम प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांची 130 वी जयंती आज महाराष्ट्र सदन व महाराष्ट्र परिचय केंद्र येथे  साजरी करण्यात आली.

कोपर्निकस मार्गस्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात निवासी आयुक्त समीर सहाय यांनी पंडित नेहरू यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी सहायक निवासी आयुक्त सुमन चंद्रा,  विजय कायरकर यांच्यासह महाराष्ट्र सदन व महाराष्ट्र परिचय केंद्राचे अधिकारी-कर्मचारी  उपस्थित होते. उपस्थित सर्वांनी पंडित नेहरू यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

महाराष्ट्र परिचय केंद्रात पंडित नेहरू यांना अभिवादन

महाराष्ट्र परिचय केंद्रात पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती साजरी करण्यात आली. महाराष्ट्र परिचय केंद्राचे उपसंचालक  दयानंद कांबळे यांनी पंडित नेहरू यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले. उपस्थित अधिकारी-कर्मचारी आणि अभ्यागतांनी यावेळी पंडित नेहरू यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!