गुन्हे वृत्त मुंबई

समलैंगिक संबंधातून ५० वर्षीय इसमाचा गळा चिरणाऱ्या २८ वर्षीय तरुणाला ठोकल्या बेड्या

मुंबई  : उसणे घेतलेले पैसे व समलैंगिक संबंधाच्या बदनामीच्या भीतीपोटी ५० वर्षीय इसमाचा गळा चिरणाऱ्या २८ वर्षीय तरुणाला बेड्या ठोकण्यात आल्या. ही उत्तम कामगिरी लोहमार्ग गुन्हे शखाच्या विशेष कृती दलाच्या पथकाने केली. २६ ऑगस्ट रोजी उघडकीस आली होती. या प्रकरणी बोरिवली लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सलमीअली मुन्ना अन्सारी (२८) व रामेश्वर मिश्रा ऊर्फ पंडित (५०) हे दोघेही उत्तर प्रदेशचे रहिवासी असून मालाड येथील शुक्ला डेअरी/तबेल्यात काम करत होते. भांडण झाल्यामुळे वर्षभरापूर्वी पंडित याने तबेल्यात काम करणे सोडून शेजारी असलेल्या एका इमारतीत वॉचमनचे काम करू लागला. दरम्यानच्या काळात सलीमअलीचे पंडित याच्यासोबत समलैंगिक संबंध प्रस्तापित झाले. या समलैंगिक संबंधाची चर्चा तबेल्यात रंगू लागल्याने सलीमअली तणावाखाली आला. त्यात आणखीभर म्हणजे उसणे दिलेल्या २६ हजार रुपयांसाठी पंडित याने सलीमअलीकडे तगादा लावला होता. पैसे दे दिले तर समलैंगिक संबंधाबाबत अख्ख्या गावाला सांगून बदनामी करेल, अशी धमकी पंडित याने सलीमअलीला दिली. बदनामीच्या भीतीपोटी सलीमअलीने पंडितचा काटा काढण्याचे ठरवले. त्यानुसार २५ ऑगस्ट रोजी रात्री ११.३५ वाजण्याच्या सुमारास सलीमअली याने हाजीबापू रोडवरील जॉय वाईन शॉप येथे पंडितला बोलावून घेतले. तेथे त्यांनी दारूच्या बाटल्या विकत घेतल्या व दोघेही रेल्वे रुळाशेजारी बसून दारू पिऊ लागले. दारूच्या नशेत पंडितने पैशांचा विषय काढला. पंडितचा काटा काढण्याचे ठरवून आलेल्या सलीमअली याने पंडितला लाथा-बुक्क्याने जबर मारहाण केली. दारूच्या तंद्रीत असलेल्या पंडित जमिनीवर पडताच सलीमअलीने सोबत आणलेल्या चाकूने त्याचा गळा चिरला.
पंडितचे हात-पाय लुंगीने बांधले व लुंगीचा फाडलेला तुकडा त्याच्या तोंडात कोंबला. पंडितचा मृतदेह मालाड-गोरेगाव रेल्वे स्थानकादरम्यान २८/०७ किलोमीटर अंतरावरील चिंचोली बंदर नाल्याजवळ आणून फेकला. खून करून मृतदेह फेकल्याचा बनाव सलीमअलीने करून तेथून पळ काढला.
दरम्यान, दुसऱ्या दिवशी २६ ऑगसट २०१८ रोजी सकाळी ११.४५ वाजण्याच्या सुमारास हातपाय बांधलेल्या मृतदेहाची माहिती मिळताच बोरिलवी लोहमार्ग पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. मृत इसमाचा गळ्यावरील वार पाहून या खुनाचे प्रकरण असल्याचे स्पष्ट झाले.
या गुन्ह्याचा तपास लोहमार्ग गुन्हे शाखेच्या विशेष कृती दलाचे पथकाकडे सोपावण्यात आला. तपासादरम्यान मृत इसमाचा फोटो मालाड-बोरिवली परिसरात दाखवण्यात आले. मात्र त्याची ओळख पटली नाही. तपास सुरू असताना लोहामार्ग पोलिसांनी मालाड पूर्व शहरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता मृत इसम तरुणासोबत दिसून आला. त्यानुसार पोलिसांचे पथक त्या तरुणाचा शोध घेऊ लागले. तपास सुरू असताना पोलिसांना मृत इसमासोबतच्या तरुणाची माहिती मिळाली. खबऱ्याने दिलेल्या माहितीनुसार लोहमार्ग पोलिसांनी मालाड परिसरातील शुक्ला डेअरीतून सलमीअली मुन्ना अन्सारी याच्या मुसक्या आवळल्या. त्याची कसून चौकशी केली असता त्याने समलैंगिक संबंधाच्या बदनामीपोटी व उसणे पैशांसाठी रामेश्वर मिश्रा ऊर्फ पंडित याचा खून केल्याची कबूल करून गुन्ह्यात वापरलेला चाकू पोलिसांच्या हवाली केला.
या गुन्ह्याचा छडा पश्चिम/मध्य लोहमार्ग परिमंडळचे उपायुक्त पुरुषोत्तम कराड, सहाय्यक पोलीस आयुक्त विनय गाडगीळ, लोहमार्ग गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष धनवटे यांच्या मार्गदर्शनाखाली लोहमार्ग गुन्हे शाखेच्या विशेष कृती दलाचे हवालदार सतीश क्षीरसागर, श्रीकृष्ण चव्हाण, विजय ढवळे, पोलीस नाईक प्रविणसिंग घार्गे, महादेव शिंदे, सुरेश येला, पोलीस शिपाई जयेश थोरात, सतीश फडके, अमित बडेकर, गणेश माने आदी पथकाने लावला.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!