*सोनू हटकर/( उल्हासनगर)कल्याण तालुक्यातील म्हारळ या ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या निवडणुकीत अखेर शिवसेनेने बाजी मारलीय. शिवसेनेच्या सुमन खरात या बिनविरोध निवड झाली आहे.
वादग्रस्त ठरलेल्या सरपंच पदाच्या निवडणुकीत सुमन खरात यांची बिनविरोध निवड झालीय.या आधीच्या सरपंचानी निवडणूकींचे नामनिर्देशन पत्र दाखल करतांना शौचालयासाठी असलेला ग्रामसभेचा ठराव जोडला नव्हता.त्यामुळे अपुऱ्या कागद्पत्राअभावी त्यांना अपात्र ठरवून त्यांचे सरपंच पद रद्द करण्यात आले होते.त्याच जागेवर निवडणूक होत शिवसनेच्या सुमन खरात या बिनविरोध निवडून आल्या आहे.यावेळी शिवसैनिकांनी कार्यकर्त्यांनी त्याचे अभिनंदन करीत एकाच जल्लोष केला.
यावेळी कल्याण जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे,उल्हासनगर शहरप्रमुख राजेंद्र चौधरी,म्हारळ शहरप्रमुख डॉ.सोमनाथ पाटील,विरोधी पक्ष नेते धनंजय बोडारे , उपशहरप्रमुख राजेंद्र शाहू,संघटक संदीप गायकवाड,युवासेना शहर अधिकारी बाळा श्रीखंडे,आदी शिवसैनिक मोठया संख्येने उपस्थित होते.