ठाणे महाराष्ट्र

पोलीस अधिकाऱ्याची तडका फडकी बदली केल्याने डायघर पोलीस स्टेशन वरील मोर्चा स्थगीत

ठाणे : ठाणे-डायघर पंचक्रोशी संघर्ष समितीचे अध्यक्ष श्री संतोष नारायण शेठ पाटील यांस पोलिसांनी केलेली मारहाण,शिवीगाळ व बेकायदेशीर पोलीस कस्टडी व गोळ्या घालण्याचा दिलेल्या इशारा प्रकरणी डायघर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक  श्री सुशील जावळे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीमती कृपाली बोरसे व इतर  तीन पोलीस यांस निलंबीत करून विभागीय चौकशी अंती बडतर्फ करावे आणि त्यांचे विरुद्ध गुन्हा दाखल करावा यासाठी संतप्त भूमिपुत्र,आगरी कोळी समाजा तर्फे डायघर पोलीस पोलीस स्टेशनवर दिनांक 05 सप्टेंबर2018 रोजी 11 वाजता हजारोंच्या संख्येने निघणारा मोर्चा ठाणे पोलीस आयुक्त मा.श्री विवेक फणसलकर यांनी त्यांची तडकाफडकी बदली केल्याने व कारवाईचे आश्वासन दिल्याच्या अनुशंगाने स्थगित केलेला आहे.
या संदर्भात डायघर डम्पिंग ग्राउंड प्रकल्पास पंचक्रोशीतील ग्रामस्थांचा विरोध असताना व ग्रामस्थांचे गैरसमज दूर होईपर्यंत कुणीही डम्पिंग ग्राऊंड वर जायचे नाही असे ठरले असतानाही कंपनीतर्फे सुरू असलेल्या मोजनिस विरोध केल्याच्या राग आल्याने डायघर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री सुशील जावळे,सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीमती कृपाली बोरसे व इतर तीन पोलिसांनी संगनमताने शिवीगाळ करून,मारहाण करून,बेकायदेशीर पोलीस कस्टडीत डांबले या प्रकरणी या अधिकाऱ्यांना निलंबित करून विभागीय चौकशी करून बडतर्फ करावे आणि गुन्हा दाखल करावा यासाठी मोर्चाचे आयोजन केले होते परंतु मा.पोलीस आयुक्त श्री विवेक फणसलकर यांनी दोन अधिकाऱ्यांची बदली केल्याने व निलंबन आणि गुन्हा दाखल करण्याचे आश्वासन व विश्वास दिल्याने सर्वपक्षीय शिष्ठमंडळाने कारवाई होणार असल्याने मोर्च्या स्थगित केलेला आहे.सर्व भूमिपुत्रांनी समाजाने याची नोंद घ्यावी असे आव्हान मोर्चाचे समन्वयक प्राचार्य लियाकतभाई शेख,संतोष केणे, गणेश म्हात्रे,रोहिदास मुंडे,बाबाजी पाटील,हिरा पाटील,गजानन पाटील,विलास म्हात्रे,गोविंद भगत,बाबुराव मुंढे,शरद पाटील,भगवान पाटील,सुनील आलिमकर,यांनी केले आहे.
या प्रकरणी सहकार्य केलेल्या नेते मंडळींचे समन्वयकांनी आभार मानले आहे.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

नवी मुंबई

error: Content is protected !!