महाराष्ट्र मुंबई

बेपत्ता झालेल्या 5 विद्यार्थिंनीचा लावला शोध..मुंबईतील कफ परेड पोलिसांची जबरदस्त कामगिरी

मुंबई : मुंबईतील कफ परेड पोलिसांनी जबरदस्त कामगिरी बजावून कुलाबा परिसरातून बेपत्ता झालेल्या विद्यार्थिनींचा शोध लावला आहे. 31 ऑगस्ट 2018 रोजी एकाच वेळी एकाच शाळेच्या या 5 विद्यार्थिंनी बेपत्ता झाल्याने एकच खळबळ उडाली होती. परिमंडळ 1 अंतर्गत असलेले सर्वच पोलीस ठाण्याचे पोलीस या विद्यार्थिनींचा शोध असताना कफ परेड पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक रश्मी जाधव यांच्या मार्गदर्शनाखील पोलीस उपनिरीक्षक विकास पाटील यांनी पोलीस पथकासह उत्तम कामगिरी बजावून 4 विद्यार्थिनींना कुर्ला रेल्वे स्थानकातून ताब्यात घेतले. त्या विद्यर्थिनींनी दिलेल्या माहितीनुसार पाचव्या विद्यार्थिनीला पोलिसांनी रात्री उशिरा ताब्यात घेतले. या पाचही विद्यार्थिनींना परिमंडळ 1 चे उपायुक्त अभिषेक त्रिमुखे यांनी पालकांच्या ताब्यात दिले.
कुलाबा परिसरातील नामांकित शाळेतील 5 विद्यर्थिनी 31 ऑगस्ट 2018 रोजी बेपत्ता झाल्या होत्या. शाळा सुटल्यानंतर विद्यार्थिनी घरी परतल्या नाहीत. त्यामुळे पाचही विद्यार्थिनींच्या पालकांनी शाळेत धाव घेतली. मुली शाळाबाहेर पडल्याचे समोर येताच पालक हादरले. त्यांनी तात्काळ कुलाबा पोलीस ठाणे गाठले. या प्रकरणी कुलाबा पोलिसांनी (गु. र. क्र. 120 /18) भादंवि कलम 363 नुसार नोंद केली.
एकाच वेळी एकाच शाळेच्या इयत्ता 8 वीत शिकणाऱ्या विद्यार्थिंनी बेपत्ता झाल्याने परिमंडळ 1 चे उपायुक्त अभिषेक त्रिमुखे यांनी परिमंडळ 1 अंतर्गत असलेल्या सर्वच पोलीस ठाण्याच्या पोलिसांना तपासाचे आदेश दिले. परिमंडळ 1 च्या अंतर्गत सर्वच पोलीस ठाण्यांचे पोलीस तपासाला लागले. रात्रभर विद्यार्थिनींचा शोध घेण्यात आला मात्र त्या सापडल्या नाहीत. दरम्यान, विद्यार्थिनींचा शोध सुरू असताना 1 सप्टेंबर 2018 रोजी कफ परेड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रश्मी जाधव यांना विद्यार्थिंनीची माहिती मिळाली.
योगायोगाने कफ परेड पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक विकास पाटील कुर्ला परिसरात कार्यालयीन कामासाठी गेले होते. वपोनि रश्मी जाधव यांनी तात्काळ पोउनि विकास पाटील यांना विद्यार्थिंनीची माहिती दिली असता, त्यांनी महिला पोलीस अंमलदारांच्या मदतीने 4 विद्यार्थिनींना ताब्यात घेतले. दरम्यान, त्यांच्याकडून विचारपूस करून रात्री उशिरा पाचव्या विद्यार्थिनीलाही ताब्यात घेण्यात आले. पाचही विद्यार्थिनींची परिमंडळ 1 चे उपायुक्त अभिषेक त्रिमुखे यांनी समजूत काढून त्यांना पालकांच्या ताब्यात दिले.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

नवी मुंबई

error: Content is protected !!