उल्हासनगर (सोनू हटकर): सीमेवर लढणाऱ्या भारतीय जवानांना रक्ताचा तुडवडा पडू नये , या सदभावनेतून कुर्ला कॅम्प येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
राधेश्याम सर यांच्या जन्मदिवसाचे औचित्य साधून कॅम्प 4येतील कुर्ला कॅम्प येथे भव्य रक्तदान शिबिर तसेच मोफत नेत्र चिकित्सा शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमात गरीब व गरजू व्यक्तींनी मोठया प्रमाणात लाभ घेतला.तसेच इ सी जी तपासणी, डायबेटीस तपासणी ,डोळ्यांचे तपासणी तज्ज्ञां डॉक्टरांकाढून करण्यात आली.
या कार्यक्रमाचे आयोजक मुंबई योद्धाज ,प्युचर मेकर लाईफ केअर प्रा. लि. संघटनेच्या वतीने करण्यात आले तसेच सदस्यांनी भारताचं एक जागृत नागरिक म्हणून समाजातील दिन दलित तसेच देशासाठी लढणाऱ्या सैनिकांसाठी कायतरी देणं गरजेचं आहे या माध्यमातून ह्या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.