मुरबाड (गितेश पवार) – छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचार धारनेतुन प्रेरीत होऊन जनहितासाठी सर्व सामान्य जनतेच्या अडी-अडचणीचे निवारण करण्यासाठी , तरुणांना स्वावलंबी बनविणे तसेच योग्य दिशा व मार्गदर्शन करण्यासाठी जनजागृती मंडळाची स्थापना केली असल्याचे या मंडळाचे संस्थापक अध्यक्ष संदिप राव यांनी कार्यक्रमावेळी सांगितले.
यावेळी उद्याटन सोहळ्यात मुरबाड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय वसावे , भाजप मुरबाड तालुका अध्यक्ष जयवंत सुर्यराव,मुरबाड नगरपंचायत उपनगराध्यक्ष अर्चना विषे नगरसेविका छाया चौधरी , माजी उपसभापती दिपक खाटेघरे , आदी मान्यवरांसह नागरीक उपस्थित होते.