ठाणेः प्लास्टिक मुक्ती आणि अवयव दानाचा मोलाचा संदेश घेऊन 29व्या महापौर वर्षा मॅरेथॉनमध्ये तब्बल 21 हजारांपेक्षा जास्त स्पर्धक धावले. प्रसिद्ध कलाकार आणि खेळाडू यांच्या उपस्थितीत ठाणे महानगरपालिका आणि ठाणे जिल्हा अॅथलेटिक्स संघटनेतर्फे आयोजित 29वी ठाणे महापौर वर्ष मॅरेथॉन मोठ्या उत्साहात संपन्न झाली.
यावेळी 15 वर्षाखालील मुलांमध्ये 5 किमी धावण्याच्या स्पर्धेत डोंबिवलीतील गार्डीयन स्कूलच्या संजयप्रसाद अयोध्याराम बिंद याने चतुर्थ क्रमांक पटकावत ब्राँझ चषक व रोख रकमेचा मानकरी ठरला. यावेळी मान्यवरांच्या हस्ते संजय प्रसादला गौरविण्यात आले. संजयच्या या यशाने गार्डीयन स्कूलच्या शालेय शिक्षक व विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.