गुन्हे वृत्त ठाणे महाराष्ट्र

जन्माष्टमीच्या दिवशी कृष्ण मंदिरात 44.76 लाखांचा मुद्देमाल लांबवणारे 6 चोरटे 8 तासांत तुरूंगात

ठाणे : जन्माष्टामीच्या दिवशी ठाणे परिसरातील जांभळी नाका परिसरातील गोपळ कृष्ण मंदिरातील सोने-चांदीचे दागिने लांबवणाऱ्या महिलेसह 6 चोरट्यांना अवघ्या 8 तासांत तुरुंगात धाडण्यात आले. ही धडाकेबाज कारवाई ठाणे पोलीस दलातील ठाणे नगर पोलिसांनी केली. कारवाईदरम्यान पोलिसांनी चोरीला गेलेला 44 लाख 76 हजार 720 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

2 सप्टेंबर 2018 रोजी चोरट्यांनी गोपळ कृष्ण मंदिराचे मागील दाराचे कुलूप तोडून चोरटे मंदिरात शिरले. मंदिरातील 900 ग्रॅम सोन्याचे दागिने, 20 किलो चांदीची भांडे, 9 लाख रुपयांची रोकड असा एकूण 44 लाख 76 हजार 720 रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेल्याची तक्रार पुजारी श्रीकृष्ण पंडित यांनी केली. या प्रकरणी ठाणे नगर पोलिसांनी (गु. र. क्र. 146/18) भादंवि कलम 454, 457, 380 नुसार गुन्हा दाखल केला.
गुन्ह्याचे स्वरूप पाहता चोरट्यांता शोधासाठी पोलिसांची पथके नेमण्यात आले. या पथकांने सर्वप्रथम मंदिर परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले. मंदिरात शिरण्यापूर्वी मंदिरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे डीव्हीआरेच्या वायरी काढल्या होत्या. त्यामुळे चोरट्यांचा शोध घेणे पोलिसांसमोर मोठे आवाहन होते. मात्र परिसरातील काही कॅमेऱ्यात संत्या ऊर्फ संतोष कांबळे निदर्शनास आला. त्यानुसार पोलिसांनी संत्याचा शोध सुरू केला. संत्याचा दिवा परिसरात राहत असल्याचे पोलिसांना समजले. पोलिसांनी तात्काळ दिवा गाठले असता संत्या नवी मुंबईतील कोपरखैराणे, महापे परिसरात असल्याचे पोलिसांना समजले. पोलिसांची पथके तात्काळ तेथे रवाना झाली. नवी मुंबईत ठिकठिकाणी नाकाबंदी केली असता तेथे शिळ साबा मार्गावर ओमनी कारमध्ये 2 इसमांनी पोलिसांना पाहून सुसाट कार पळवली. पोलिसांनी 1 किलोमीटरपर्यंत चोरट्यांचा पाठलाग करून कार अडवून संत्याच्या साथीदारासह मुसक्या आवळल्या. संत्याची कसून चौकशी केली असता त्याने मंदिरात चोरी केल्याची कबुली दिली. संत्यामे दिलेल्या माहितीनुसार अरुण छोटेलाल सोलकर (19), रेखा संतोष कांबळे (21), शहजाद नसीबअल्ली खान (25), इल्फिकार समुरुद्दीन मन्सुरी (22), आजाद माशुक शहा (19) यांना अटक केली आहे.
तपासादरम्यान कारची झडती घेतली असता त्यात 2 लाख रुपयांची रोकड पोलिसांनी जप्त केली. जप्त केलेली कार मंदिरातून चोरी केलेल्या पैशांतून विकत घेतल्याची माहिती संत्याने दिली. तसेच त्याने दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी दिवा परिसरातील घरातून 38 लाख 50 हजार रुपयांची सोने – चांदीचे दागिने, 4 लाख 20 रुपयांची रोकड, गाडीतील 2 लाख रुपयांची रोकड, दानपेटीतील 6 हजार 720 रुपयांची चिल्लर असा एकूण 44 लाख 76 हजार 720 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
अवघ्या 8 तासांत चोरट्यांना तुरुंगात धाडण्यासाठी मोलाची कामगिरी बजावणाऱ्या पोलिसांची नावे व फोटो जोडत आहेत.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!