शहापूर (गितेश पवार) : शेणवा – किन्हवली या मुख्य रस्त्यालगत उंभ्रई बस स्टॅण्ड पासून जवळ असलेला व विद्युत पुरवठा खंडित असलेला तसेच धोकादायक असलेला विद्युत वाहक पोळ मागील महिन्यात झालेल्या वादळी वाऱ्यात रोडच्या दिशेने झुकला आहे. तो पडून जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याबाबतची माहिती गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेब युवा प्रतिष्ठानचे शहापूर तालुका सचिव कु. गणेश धोंडू चौधरी यांनी शेणवा महावितरणचे उपअभियंता श्री खैतापूरकर यांच्या निदर्शनास आणून दिली आहे व लवकरात लवकर या पोलची दुरुस्ती व्हावी व नागरिकांना तसेच प्रवाशांना दिला द्यावा अशी विनंती सुद्धा केली आहे.
काल रविवार दिनांक २ सप्टेंबर रोजी गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेब युवा प्रतिष्ठानचे सचिव कु.गणेश धोंडू चौधरी, प्रतिष्ठानचे अध्यक्ष सोमनाथ धिर्डे साहेब,प्रतिष्ठानचे सदस्य पंढरीनाथ ढमके, सदस्य महेश चौधरी, उंभ्रई गावचे ग्रामस्थ नरेश चौधरी, अमोल चौधरी, मनोहर चौधरी, यांनी प्रत्येक्षात जाऊन पुन्हा एकदा सदर पोलची पाहणी केली.
दररोज याच रस्त्याने प्रवास करणारे प्रवासी फोफोडी गावचे पोलीस पाटील श्री राजेश मोरघे ,उंभ्रई गावचे रहिवासी नरेश चौधरी.
गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेब युवा प्रतिष्ठानचे शहापूर तालुका सचिव कु.गणेश धोंडू चौधरी यांनी आपल्या प्रतिक्रियेतून पुन्हा एकदा सदर पोलची दुरुस्ती व्हावी अशी मागणी महावितरण विभागाकडे केली आहे.