महाराष्ट्र मुंबई

केरळ पूरग्रस्तांसाठी नांदेडच्या गुरुद्वारा बोर्डतर्फे 20 लाखांचा धनादेश मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द

मुंबई, दि. 4 : केरळ पूरग्रस्तांच्या मदतीसाठी गुरुद्वारा बोर्ड तख्त सचखंड श्री हजुर अबचलनगर साहिब, नांदेडतर्फे 20 लाखांचा धनादेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आज सुपूर्द करण्यात आला.

यावेळी गुरुद्वारा समितीचे अध्यक्ष आमदार सरदार तारासिंग, चहल सिंग, प्रेमज्योतसिंग चहल, अमरीक सिंग वासरीकर, शेरसिंग फौजी,गुरूंदर सिंग बावा, एकबाल सिंग सबलोक आदी उपस्थित होते

श्री नृसिंह सरस्वती स्वामी दत्त देवस्थान, नृसिंहवाडीतर्फे पाच लाखांचा धनादेश

नृसिंहवाडी येथील श्री नृसिंह सरस्वती स्वामी दत्त देवस्थानतर्फे केरळ पूरग्रस्तांसाठी पाच लाखांचा मुख्यमंत्री सहायता निधीसाठीचा धनादेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. यावेळी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील,कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत,संस्थानचे अध्यक्ष विकास पुजारी,सचिव गुंडू पुजारी, विश्वस्त अवधूत पुजारी, आशिष पुजारी, प्रशांत कोडणीकर उपस्थित होते.

पूरग्रस्तांना राज्य शासनाकडून विविध प्रकारच्या मदतीचा ओघ सुरू असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आवाहनाला राज्यातील जनता व विविध सामाजिक संस्था, मंदिर संस्था मुख्यमंत्री सहाय्यता निधीस मदत करीत आहेत.

दोशी हिंदू सभा हॉस्पिटलच्या वतीने दोन लाखांचा धनादेश

घाटकोपर मधील हिराचंद जयचंद दोशी हिंदू सभा हॉस्पिटलच्यावतीने केरळ पूरग्रस्तांच्या मदतीसाठी दोन लाख रूपयांचा धनादेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे  सुपूर्द करण्यात आला.

हॉस्पिटलचे अधिकारी, कर्मचारी यांनी एक लाख रूपयांचा निधी एकत्र केला. त्यामध्ये व्यवस्थापकीय संचालक मगनलाल दोशी यांनी एक लाख रूपयांचे योगदान दिले. दोन लाख रूपयांचा  धनादेश हॉस्पिटॅलचे संचालक डॉ. वैभव देवगिरकर यांनी मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्याकडे सुपूर्द केला. हॉस्पिटलच्यावतीने जेनेरिक औषध मोहीम विशेषत्वाने राबविण्यात येत असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.

About the author

Aapale Shahar

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

कोकण

नवी मुंबई

error: Content is protected !!