डोंबिवली :- दि. ०४ ( शंकर जाधव ) एखाद्या शहरावर , राज्यावर नैसर्गिक आपत्ती आल्यास सर्व राज्यात मदतीचा ओघ वाहू लागतो. मग ती मदत आर्थिक असू देत किंंवा वस्तू, धान्यांच्या स्वरुपात असू देत. अश्यावेळी सेलिब्रेटी आणि राजकीय पक्षही मागे नसतात. मात्र डोंबिवलीतील एका चिमुकलीने वाढदिवसादिनी आपल्या मनीबँकेतून केरळ पूरग्रस्तांना मदत केली. बालवयात तिची ही समाजसेवा पाहून तिचे शाळेच्या मुख्याध्यापिका आणि शिक्षकांनीहि कौतुक केले.
डोंबिवली पूर्वेकडील पांडुरंगवाडीतील मॉडेल शाळेत शिकणारी ४ वर्षाची रुदा मेनन आपल्या वाढदिवसादिनी आपल्या मनीबँकेतून ४५५७ रुपये आपल्या वाढदिवसादिनी केरळ पूरग्रस्तांना मदत म्हणून दिले. शाळेच्या मुख्याध्यापिका लाली पिल्लई यांच्याकडे हे पैसे देत असताना तिच्या सोबत तिचे आजोबा वासू मेनन आणि तिची आई रागी मेनन उपस्थित होते.चिमुकलीने केलेली मदत खरच कौतुकास्पद असून तिची मदत आमची शाळा कधीही विसरू शकत नाही. केरळ येथील एका ट्रस्टकडे हि रक्कम दिली जाणार असून तिची मदत केरळ पूरग्रस्तांसाठी छोटी का होईना पण महत्वाची आहे.एवढ्या लहान वयात तिचे आजोबा वासूदेव मेनन , आजी पुष्पा मेनन , वडील – राकेश आणि आई रागी यांनी तिच्यावर असे संस्कार केले आहे. त्यामुळे हि मुलगी मोठी झाल्यावर समाजासाठी एक आदर्श ठरेल असे शाळेच्या मुख्याध्यापिका लाली पिल्लई यांनी यावेळी सांगितले. रुद्राने आपला पहिला वाढदिवस कल्याण पूर्वेकडील नवज्योत वृद्धाश्रमात तर दुसरा वाढदिवस उल्हासनगर येथील बालगृहात साजरा केला.तिसऱ्या वाढदिवस रुद्रा भिवंडी येथील एस.बी.बालाश्रम येथील बच्चेकंपनीबरोबर साजरा. आपल्या नातीचा वाढदिवस हा समाजाला एक आदर्श ठरावे आणि आपली हातून जेवढी मदत होईल तेवढी मदत करू असे आजोबा वासूदेव मेनन यांनी सांगितले.