
डोंबिवली :- दि.०४(शंकर जाधव ) भाजपच्या वतीने डोंबिवली पूर्वेकडील बाजीप्रभू चौकात लावलेल्या मानाची दहीहंडी उत्सवात गोविंदा पथकातील प्रत्येकालाच नव्हे तर त्या चौकातील एक किलोमीटर परिसरात असलेल्या नागरिकांना तब्बल सव्वा लाखाचा विमा कवच मिळाला होता.हा विमा त्या दिवसापूरता असला तरी त्यावेळी त्या एक किलोमीटर परिसरात दहीहंडी फोडण्यासाठी येणाऱ्या गोविंदा पथकातील कोणीही जखमी झाले असते तर त्यांच्यावर उपचारासाठी विमा कामास आला असता .ही संकल्पना राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांची होती, अशी माहिती भाजप डोंबिवली शहर अध्यक्ष संजीव बिडवाडकर यांनी दिली.राज्यात प्रथमच अश्या प्रकारचा विमा काढण्याने सर्व जण भाजपचे आणि राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांचे कौतुक करत आहे.