महाराष्ट्र

महाराष्ट्रातील गणेशोत्सव देशविदेशातील पर्यटकांपर्यंत पोहोचणार – पर्यटनमंत्री जयकुमार रावल

मुंबई, दि. ०४ :  राज्यात साजरा होणारा गणेशोत्सव परदेशातील पर्यटकांपर्यंत पोहोचविण्यासाठी महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळ तसेच मुंबई महापालिका विशेष नियोजन करीत आहे. गिरगाव चौपाटी येथे गणेश विसर्जन पाहण्यासाठी परदेशी पर्यटक आकर्षित व्हावेत यासाठी यंदा विशेष व्यवस्था करण्यात येत आहे. महाराष्ट्रातील या समृद्ध संस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या या उत्सवात परदेशी पर्यटकांना सहभागी होता यावे यासाठी गिरगाव चौपाटीवर खास व्यासपीठ उभारण्यात येणार आहे. ३०० हून अधिक पर्यटकांना सामावून घेण्याची क्षमता असलेले हे व्यासपीठ असेल. यामुळे महाराष्ट्रातील गणेशोत्सव देशविदेशातील पर्यटकांपर्यंत पोहोचेल, असे पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

 

गिरगाव चौपाटी येथे मंत्री श्री. रावल यांनी यासंदर्भात करण्यात येत असलेल्या नियोजनाची पाहणी केली.त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना ते म्हणाले की, जगातील अनेक पर्यटक मुंबईतील गणेशोत्सव पाहण्यासाठी उत्सुक असतात. त्यांना चांगल्या पद्धतीने गणेशविसर्जन पाहता यावे यासाठी हे नियोजन करण्यात येत आहे. परदेशी पर्यटक हे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्याwww.maharashtratourism.gov.in या संकेतस्थळावर जाऊन नोंदणी करू शकतात. यासंदर्भात देशविदेशातील ट्रॅव्हल एजंट,देशविदेशातील पर्यटन कंपन्या आदींच्या मार्फत परदेशी पर्यटकांपर्यंत माहिती पोहोचविण्यात आली आहे.  या संकेतस्थळावर नोंदणी केल्यानंतर पर्यटकांना त्यांच्या हॉटेलपासून गिरगाव चौपाटीपर्यंत  ने-आण करणे याचेही नियोजन करण्यात आले आहे.  गणपती विसर्जन उत्सवाचा आनंद घेण्यासाठी गेल्या वर्षी थायलंड देशातील १७५ पर्यटक उपस्थित होते. हे लक्षात घेता यावर्षी सुरुवातीपासूनच नियोजन करण्यात आले आहे. यासाठी गिरगाव चौपाटी येथे तयार करण्यात येत असलेल्या व्यासपीठावर ३०० पर्यटकांची व्यवस्था करण्यात येत आहे. या पर्यटकांना शुद्ध पाणी, अल्पोपहार,फिरती स्वच्छतागृहे, बससेवा यांसह इतर आवश्यक सुविधा पुरविण्यात येतील.  या माध्यमातून महाराष्ट्रातील गणेशोत्सव हा एक आंतरराष्ट्रीय सोहळा म्हणून प्रस्थापित करण्याचा एमटीडीसी आणि मुंबई महापालिकेचा मानस आहे, असे त्यांनी सांगितले.

यावेळी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे सहव्यवस्थापकीय संचालक आशुतोष राठोड,महापालिकेचे उपायुक्त हर्षद काळे आदी उपस्थित होते.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

नवी मुंबई

error: Content is protected !!