पालघर: आजचे आदर्श शिक्षक उद्याचे आदर्श नागरिक घडविणार आहेत म्हणून शिक्षकांनी विद्यार्थ्यांवर सुसंस्कार, नीतमूल्य, सकारात्मक जीवनदृष्टी नर्माण करून विद्यार्थ्यांच्या व्यक्तीमत्वाला आकार देण्याचे कार्य प्रामाणिकपाने करावे असे आवाहन पालघर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष श्री. विजय खरपडे यांनी केले. पालघर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागा मार्फत जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहोळ्याचे आयोजन पालघर येथील आनंद आश्रम शाळेच्या सभागृहात करण्यात आले होते. सातत्याने होत असलेल्या मागणी प्रमाणे प्राथमिक शिक्षकांन प्रमाणे माध्यमिक शिक्षकांना हि पुढील वर्षात आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात येईल आही माहिती जि. प. अध्यक्ष यांनी यावेळी दिली.
यावेळी मोखाडा तालुक्यातून श्री. दिनकर पांडुरंग फसाळे, वसई तालुक्यातून संगीता जगदीश जाधव, तलासरी तालुक्यातून पंकज किसान पाटील, जव्हार तालुक्यातून यशवंत झिपरू लहारे, वाडा तालुक्यातून संजय हरिश्चंद्र पाटील, विक्रमगड तालुक्यातून अनिल शंकर पठारे, डहाणू तालुक्यातून दीपक लक्ष्मन देसले आणि पालघर तालुक्यातून जयमाला सुर्यकांत सूर्यवंशी यांना यावेळी आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात आले.
प्रसंगी पालघर जिल्ह्याचे खासदार श्री.राजेंद्रजी गावित यांनी पुरस्कार प्राप्त शिक्षकांचे अभिनंदन करून इतर शिक्षकांनी त्यांचा आदर्श घेऊन विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासा साठी प्रयत्नशील असावे असे प्रतिपादन यावेळी केले.
पालघर जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष व शिक्षण समिती सभापती . श्री. निलेश गंधे यांनी आदिवासी आणि दुर्गम भागात शिक्षण व्यवस्था पोहोचविण्यासाठी सर्व शिक्षकांनी केल्या प्रयत्नांची प्रशौंसा केली व पालघर जिल्ह्याचे विद्यार्थीचे गुणगान राज्य पातळीवर यशस्वीपणे होण्यासाठी सर्व शिक्षकांनी अवक्षक प्रयत्न करावे असे मत यावेळी मांडले.
विद्यार्थीचा शेक्षणिक विकासा बरोबर त्यांच्यातील विविध कला गुणानां प्रोत्साहन देऊन त्यांच्यातील आत्मविश्वास वाढण्यासाठी या विजेते शिक्षकांचा आदर्श गेऊन सर्व शिक्षकांनी विविध नाविन्यपूर्ण उपक्रम आपापल्या शळेत राबवावेत असे मत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. मिलिंद बोरीकर यांनी व्यक्त केले.
प्रसंगी पालघरचे आमदार श्री.अमित घोडा, जि. प. चे अति. मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. एन. के. जेजुरकर, शिक्षण अधिकारी श्री.राजेश कंकाळ, जि. प. सभापती श्रीम. धनश्री चौधरी, श्रीम. दर्शना दुमाडे,. श्री.अशोक वडे, पालघर पंचायत समिती सभापती . श्रीम. मनीषा पिंपळे, वसईचे पंचायत समिती सभापती श्री. संदीप म्हात्रे, वाडा पंचायत समिती सभापती ,श्रीम.अश्विनी शेळके, मोखाडा पंचायत समिती सभापती श्री. प्रदीप वाघ, जि. प सदस्य श्रीम.सुरेखा थेतले,.श्री.धर्मा गोवारी श्री. प्रकाश निकम. श्रीम. नीता पाटील, मा. श्रीम. मिताली राउत श्रीम. रंजना संखे, श्री. कमलाकर दळवी श्री. तुलसीदास तामोरे आदि मान्यवर आणि शिक्षक उपस्थित होते.