ठाणे : भाजपचे राम कदम यांनी दहीहंडी उत्सवात उत्साहाच्याभरात ‘तुम्हाला पसंत असलेली मुलगी पळवून आणेन आणि तुम्हाला देईन’ असं भयंकर वक्तव्य केल्याचे पडसाद राज्यभर उमटत आहेत. राम कदम यांच्या वक्तव्याचा निषेध करत ठाणे येथे काँग्रेसच्या महिलांनी राम कदम यांना बांगड्यांचा आहेर पाठवून निषेध व्यक्त केला
ठाण्यातील काँग्रेस कमिटी कार्यालयाबाहेर ठाणे शहर काँग्रेस कमिटी अध्यक्ष मनोज शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेसच्या महिलांनी राम कदम यांच्या प्रतिमेला जोडो मारो आंदोलन करून कदम यांना बांगड्यांचा आहेर पाठवून अनोखे आंदोलन केले.यावेळी ठाणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी उपाध्यक्षा संगीता वीरधवल घाग,सुप्रिया पाटील,महासचिव अनघा कोकणे,सचिव कविता विश्वकर्मा,वैशाली भोसले,स्वाती मोरे, महिला ब्लॉक उपाध्यक्षा मीना कांबळे,चंपाताई घुटे,कविरा जाधव आदी महिला या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या.
राम कदम यांनी केलेल्या वक्तव्यामुळे त्यांना चप्पल काढून मारावं वाटतं, अशा संतप्त प्रतिक्रिया महिला वर्गानं व्यक्त केल्या. तसेच फक्त माफी चालणार नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपनं त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी ठाणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी उपाध्यक्षा संगीता वीरधवल घाग यांनी केली