डोंबिवली :- दि. ०६(शंकर जाधव )शिवसंस्कृती प्रतिष्ठान आणि शिवसेनेच्या वतीने ब्राम्हण सभेत पार पडलेल्या गणेश दर्शन स्पर्धा २०१७चा बक्षीस समारंभात गोग्रासवाडीतील शिवनेरी मित्र मंडळाने प्रथम पारितोषिकाचे मानकरी ठरले.तर राजाजी पथ मित्र मंडळाला दुसरा क्रमांक मिळाला.श्रीच्या आकर्षक मूर्तीसाठी डोंबिवली पश्चिमेकडील जाधववाडी मित्र मंडळाला पारितोषिक मिळाले.
बक्षीस समारंभाच्या अध्यक्षस्थानी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, माजी नगराध्यक्ष आबासाहेब पटवारी, महापौर विनिता राणे होत्या. तर विशेष उपस्थिती म्हणून स्थायी समिती सभापती राहुल दामले, युवा सेना जिल्हाधिकारी तथा नगरसेवक दिपेश म्हात्रे, डोंबिवली शहरप्रमुख राजेश मोरे, शिवसंस्कृती युवा प्रतिष्ठान अध्यक्ष भाऊसाहेब चौधरी,जिल्हा प्रमुख महिला आघाडी लता पाटील, महिला संघटक तथा शिवसंस्कृती युवा प्रतिष्ठान सदस्य कविता गावंड, महिला शहर संघटक किरण मोंडकर, बाल कल्याण सभापती दिपाली पाटील आदि मान्यवर उपस्थित होते. प्रथम क्रमांक पटकावणा-या शिवनेरी मित्र मंडळाला रोख रक्कम ३१ हजार, दुसरा क्रमांक मिळणाऱ्या राजाजी पथ मित्र मंडळाला २१ हजार रोख, तृतिय क्रमांक मिळालेल्या पश्चिमेकडील गोकूळ मित्र मंडळाला ११ हजार रूपये, दत्तनगर येथील शास्त्री हॉलमध्ये भरविण्यात येणा-या गणेशोत्सव मंडळ आणि सुनिलनगर गणेशोत्सव मंडळाला उत्तेजनार्थ आणि आकर्षक मूर्तीसाठी डोंबिवली पश्चिमेकडील जाधववाडी मित्र मंडळाला ५ हजार रूपये मान्यवरांच्या हस्ते रोख रक्कम देण्यात आले. गणेश मित्र मंडळाला अडीच हजार रूपयांचे पारितोषिक व सगळया विजेत्यांना आकर्षक सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र देखिल देण्यात आले. यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे म्हणाले, प्लास्टिक बंदीसाठी पहिल्यादा युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी आवाज उठविल्यावर त्याचे सर्वांनी स्वागत केले. गणेशोत्सवात मंडळांनी प्लास्टिकचा कमीत कमी वापर करण्याकडे लक्ष दिले याबद्दल त्याचे कौतुक केले पाहिजे. डोंबिवलीचे प्रथम नगराध्यक्ष आबासाहेब पटवारी यांनी शिवसंस्कृती प्रतिष्ठानचे कौतुक केलेयावेळी प्रतिष्ठानचे ललित शाईवाले, राज परब, किशोर मानकामे , परिवहन समिती सदस्य संतोष चव्हाण आदीही उपस्थित होते. प्रख्यात व्यंगचित्रकार जोशी,कलेचे अभ्यासक शिक्षक विवेक ताम्हणकर वास्तूविशारद निनाद वैद्य, पत्रकार अनिकेत घमंडी आदींनी या स्पर्धेचे परिक्षक म्हणुन काम पाहिले होते. यावेळी खासदार शिंदे, भाऊसाहेब चौधरींसह परिक्षकांची मनोगते व्यक्त झाली.