मुंबई, दि.7 : जकार्ता येथे झालेल्या आशियाई सेलिंग स्पर्धेत रजत पदक मिळविलेल्या मुंबईच्या श्वेता शेर्वेकर या खेळाडूचे आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी अभिनंदन केले. आज मंत्रालयात श्वेताने डॉ. सावंत यांची भेट घेतली. ती होमिओपॅथीची विद्यार्थिनी असून पदवी शिक्षण घेत असताना तिने मिळविलेले यश राज्यासाठी अभिमानास्पद असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. श्वेताने शिक्षण पूर्ण केल्यानंतर आरोग्य विभागात नोकरी देण्याबाबत आरोग्यमंत्र्यांनी यावेळी ग्वाही देऊन तिला भविष्यातील कामगिरीसाठी शुभेच्छा दिल्या.