मुंबई : आजोबाच्या संपत्तीसाठी त्यांची हत्या करणाऱ्या नातवासह 5 जणांना अटक करण्यात आली आहे. ही उत्तम कामगिरी माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलिसांनी अवघ्या 48 तासांत केली. या आरोपींना 6 सप्टेंबर रोजी न्यायालयत हजर केले असता 1 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्याच्या साथीदारांसह माता रमाबाई आंबेडकर मार्ग
मुंबईतील शहीद भगतसिंग मार्ग, गोवा स्ट्रीट येथे संत निवास इमारत आहे. या इमारतीत राहणाऱ्या अजा तेजलिंग लामा (८७) यांची ४ सप्टेंबर 2018 रोजी हत्या करण्यात आली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. लामा यांच्या छातीवर वार केल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला. या हत्येप्रकरणी माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलीस ठाण्यात (गु. र. क्र. 227/18) भादंवि कलम 302 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
या हत्याकांडाचा तपास करताना पोलिसांनी लामा यांचा नातू दोरजी टेनसिंग लामा (२९) याची चौकशी केली असता, त्याने दिलेल्या उडवाउडवीच्या उत्तरांमुळे त्याच्यावर पोलिसांना संशय आला. पोलिसांनी त्याची उलटतपासणी केली असता सत्य उजेडात आले. आजोबा अजा तेजलिंग लामा यांची संपत्ती मिळण्यासाठी त्यांच्या हत्तेचा कट रचल्याचे दोरजी लामा याने पोलिसांनी सांगितले. या हत्याकांडात सहभागी असलेल्यांची नावे पोलिसांना सांगितली. त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी डोंबिवली परिसरातून उत्कर्ष ऊर्फ कृष्णा सोनी (१९), अजेंल डॅनिअल भिसे (२२), जयेश ऊर्फ फॅन्ड्री कनोजिया (१९), आनंद राय (२१) यांच्या मुसक्या आवळल्या.
अटक करण्यात आलेले सर्व आरोपी पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्यांच्याविरुद्ध डोंबिवली पश्चिम येथील विष्णू नगर पोलीस ठाण्यात खून, जबरी चोरी, घरफोडी, मारामारी आदी गुन्हे दाखल असल्याचे तपासात उघडकीस आले आहे. .
सदर हत्याकांड परिमंडळ १ चे उपायुक्त अभिषेक त्रिमुखे, सहाय्यक पोलीस आयुक्त विजय कदम, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय कांबळे, महिला पोलीस निरीक्षक (गुन्हे) रागिणी भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली पोउनि सचिन पाटील, पोउनि रवींद्र पाटील, पोउनि योगेश भोसले, सपोउनि कापसे, कुपटे, हवालदार कांबळे उघाडे, हंकारे, महाले, पोना खाडे, भोईटे, ठेंगळे, साबळे, जाधव, पोशि इंगळे, आव्हाड, गायकवाड, धायगुडे, पवार, लोकेकर, दंडगुले, शेजवळ, संदीप पाटील आदी पोलीस पथकाने अवघ्या ४८ तासांत उघडकीस आणले.