गुन्हे वृत्त महाराष्ट्र

सात लाखांचा गुटखा जप्त

जळगाव : नवीन बसस्थानकाच्या मागील बाजुस असलेल्या चोपडा मार्केट मधील संतोष ट्रेडर्सच्या गोडावून मधुन अन्न व औषध विभागातर्फे 6 लाख 93 हजार रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला आहे.

महाराष्ट्र शासनाने गुटखा विक्रीवर बंदी केली असतांना परराज्यातुन सर्रासपणे गुटखा जळगावात आणुन विकला जातो. तसेच शहरात अनेक ठिकाणी गुटखा साठविला जात असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाच्या पथकाला मिळाली. त्या अनुषंगाने सहा. आयुक्त वाय.के. बेंडकुळे अन्न सुरक्षा अधिकारी सुवर्णा महाजन,

कर्मचारी अनिल गुजर, विवेक पाटील यांनी दुपारी दोन वाजेच्या सुमारास शहरातील चोपडा मार्केंटच्या संतोष ट्रेडर्स या गोडावुनमध्ये धाड टाकली.
या ठिकाणाहुन गुटख्याचे तीन हजार पाकीटे व तंबाखुचे जवळपास चार हजार पाकीटे असा 6 लाख 93 लाखांचा गुटखा व तंबाखुजन्य पदार्थ जप्त करण्यात आले आहे. दरम्यान पथकाने याप्रकरणी एका जणाला ताब्यात घेतले आहे.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

ठाणे

ठाणे

देशात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव व हरघर तिरंगा अभियान सुरू असतानाच शहापूर तालुक्यातील आद्यक्रांतीकारी राघोजी भांगरे यांच्या समाधी स्थळांची दयनीय अवस्था ?जिल्हाधिकां-याचा सकारात्मक प्रतिसाद !

Advertisements

कोकण

नवी मुंबई

error: Content is protected !!