ठाणे

जाणता राजा मित्र सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची शहीद सैनिकांना श्रद्धांजली…

 डोंबिवली:- दि. ०८  ( शंकर  जाधव)  आजदेपाडा येथील जाणता मित्र सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या श्री गणेशाच्या  आगमनावेळी देशासाठी प्राणाचे बलिदान देणाऱ्या सैनिकांना भावपूर्ण श्रधांजली वाहिली. यावेळी उपस्थित गणेशभक्तांनी प्रचंड गर्दी केली होती. मंडळ दरवर्षी सामाजिक उपक्रम राबवीत असून समाजसेवा हेच मंडळाचे उद्देश असल्याचे  मंडळाचे अध्यक्ष नंदू परब यांनी यावेळी सांगितले.

   सायंकाळी दीनदयाळ रोड येथील गणपती कारखान्यातून मोठ्या उत्सवात जाणता मित्र सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांनी गणेशाच्या मूर्तीचे आगमन मिरवणूक सुरु केली होती. मंडळाचे यंदाचे १७ वे वर्ष आहे. डोंबिवली पश्चिमेकडील दौरका हॉटेल जवळ श्री गणरायाच्या आगमन होत होत असताना मंडळाचे पदाधिकाऱ्यांनी सैनिकांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.यावेळी भारतीय तिरंग्याचे रंग असलेल्या फुग्यांना सैनिकांना आदरांजली वाहणारा कागदी फलक लावून तो अध्यक्ष नंदू परब आणि पदाधिकाऱ्यांनी हवेत सोडले आणि शहीद सैनिकांना मानवंदना देण्यात आली. चौकात अनेक भक्तगण या आगमन सोहळ्यात सहभागी झाले होते श्री गणेशच्या आगमनावेळी मंडळाच्या वतीने छायाचित्रण स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. मंडळाच्या आगमन होत असताना छायाचित्र काढावे आणि ते फोटो shetty.lathesh97 @gmail.com वर सेंट  करण्याचे आवाहन करण्यात आले होते.शिवध्वनी ढोल पथकाने गजरात गणपती बाप्पाचा आगमन सोहळा पार पडला.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!