रोगकारक घटक —डेंग्यू जातीचे विषाणू (virus)
पसरवणारे घटक—मच्छर(डास) –एडीस इजिप्ते जातीचे(Aedes Aegypti)
जीवनचक्र—
या जातीचे मच्छर ताज्या साठलेल्या पाण्यात वाढतात.कुंड्या,टायर,नारळाच्या कवट्या,प्लास्टिकच्या भांडी इत्यादी घराच्या अवतीभवती आढळणार्या वस्तूंमध्ये ते वाढतात.त्यांचे चावा घेण्याचे प्रमाण दिवसा अधिक असते.
रूग्णांमधील लक्षणे–
डेंग्यू ताप हा कमीअधिक अशा वेगवेगळ्या तीव्रतेचा असू शकतो.
१) डेंग्यू ताप (Dengue Fever)–
लहान मुलांमध्ये मुख्यत्वे सॊम्य स्वरुपाचा ताप येतो.मोठ्या माणसांमध्ये अधिक तीव्रतेचा ताप सोबत डोके, डोळे दुखणे,अंगदुखी ,अशक्तपणा,अंगावर लाल रंगाचा चट्टा येऊ शकतो.अंगदुखी तीव्र स्वरूपात असू शकते म्हणून याला हाडे मोडणारा ताप (Break bone fever) असेही म्हणतात.
२) डेंग्यू रक्तस्त्राव ताप (Dengue hemorrhagic fever)-
हा गंभीर स्वरूपाचा प्रकार असून यात तापाबरोबरच बाह्य रक्तस्त्राव– चट्टे उठणे,हिरड्यांमधून रक्तस्त्राव;तसेच अंतर्गत रक्तस्त्राव–आंत्रामधून रक्तस्त्राव,प्लेटलेटची संख्या कमी होणे इत्यादी प्रकार होऊ शकतात. तसेच छातीत,पोटामध्ये पाणी जमा होऊ शकते.
३) डेंग्यू अतिगंभीर आजार (Dengue shock syndrome)-
ही डेंग्यू रक्तस्त्राव तापाचीच पुढची अवस्था असून काही टक्के लोकांमध्ये ही दिसून येते.यात रूग्णाचे अस्वस्थ होणे, थंड पडणे, नाडी मंदावणे,रक्तदाब कमी होणे आणि शेवटी मृत्यू ओढावू शकतो.
तपासणी—
रक्ततपासणीमधून या रोगाचे निदान होऊ शकते.
प्रतिबंध–
डासांना आळा घालणे हा एकमेव उपाय रोगाला प्रसरवण्यापासून थांबू शकतो. घराच्या आजुबाजूला पाणी साठू न देणे, वेळ्च्यावेळी साठलेले पाणी रिकामे करणे.
ताप होऊ नये यासाठी डास न चावणे हा एकमेव खात्रीशीर उपाय आहे .