शहापूर : शेणवा – किन्हवली रस्त्यावरून मध्यरात्री ते पहाटे पर्यँत अवजड वाहनांची वाहतूक मोठ्या प्रमाणात होत असते. आज पहाटेच्या सुमारास ऐका कंटेंनरने विद्युत वाहक तारांना दिलेल्या धडकेत ग्रुप ग्रामपंचायत मुगाव परटोली अंतर्गत येणाऱ्या परटोली बस स्टॅण्ड जवळ असलेल्या कै.राधाबाई मनोहर पाटील फार्महाऊस परिसरातील तसेच वाहतुकीच्या मुख्य रस्त्याच्या दुतर्फा असलेले ३ विद्युत वाहक पोल पडले असून काही पोळ वाकले आहेत. सुदैवाने यात कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही.
सदर पोल पडल्याची माहिती महावितरण विभागाकडे दिली आहे. परंतु काही दिवसांवर गणेशोत्सव येऊन ठेपला आहे त्यामुळे लवकरात लवकर महावितरण विभागाने सदर लाईन दुरुस्ती न केल्यास नागरिकांना अंधारातच राहावे लागणार आहे त्यामुळे याचा फटका दुकानदार, दुग्ध व्यवसाय करणाऱ्या व्यापारी वर्गाला तसेच वेल्डर दुकान चालकांना बसणार आहे.
नागरिकांना त्रास होऊ नये म्हणून महावितरण विभागाने वेळीच याकडे तातडीने लक्ष घालून लवकरात लवकर पोलांची दुरुस्ती करावी तसेच ज्यांच्यामुळे असे अपघात होऊन सर्वसामान्य नागरिकांना त्रास होतो तसेच महावितरण विभागाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते त्याबद्दल मुजोर कंटेंनर चालकांवर गुन्हा दाखल करुन योग्य ती कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली आहे.
कंटेंनरच्या धडकेने विद्युत वाहक पोल पडले.. कंटेनरचालकावर कारवाई करण्याची मागणी
