ठाणे : ठाण्यातील तीन हात नाका सिग्नलवर भीक मागणारी मुलं शिक्षणाच्या मुळ प्रवाहात यावी म्हणून वर्षभरापूर्वी सिग्नल शाळेची मुहुर्तमेढ रोवली गेली. गेल्या दोन वर्षांत सिग्नल शाळेचा निकाल ९९ टक्के इतका लागला तर यावर्षी दोन मुले दहावी पास झाली त्यातील एकाला ७७ टक्के त दुसऱ्याला ६५ टक्के पडले.
सिग्नल शाळेत आज ४५ मुले शिकत असून येत्या दोन महिन्यात ठाण्यातील इतर सिग्नलवरील अजून २२ मुले स्कुल बसच्या माध्यमातून शाळेत आणून ठाणे शहर बालभिकारी मुक्त करण्याचा समर्थ भारत व्यासपीठाचा मानस आहे. या कामाला लोकसहभागाची गरज आहे.
आपल्या घरी किंवा आपल्या ओळखीतल्या कुणाकडे घरगुती व सार्वजनिक बाप्पाची प्रतिस्थापना होत असेलच. काम फक्त इतकेच की विद्येच्या या देवतेसमोर सिग्नल शाळेसाठीचा डोनेशन बॉक्स आपण ठेवावा व दक्षिणारूपी आलेले दान सिग्नल शाळेच्या पुढील वाटचालीसाठी उपलब्ध करून द्यावे.
आपण दिलेल्या देणगीची पावती मिळेल आपली देणगी आयकर सुट प्राप्त असेल.
डोनेशन बॉक्स आपण येथून घेऊ शकता,
समर्थ भारत व्यासपीठ, साईकृपा, गणपती कारखान्यासमोर, धर्मवीर मार्केट शेजारी, राम गणेश गडकरी पथ, घंटाळी, नौपाडा, ठाणे
डोनेशन बॉक्स घरपोच मिळवण्यासाठी आम्हाला फोन करा.
कार्यालय – ०२२- २५४५४६४४ वेळ (स. ११ ते सायं. ७ रविवार बंद )
भटू – ९९८७०३०९१६, आरती – ०९६१९९९८४७६
For more details plz click
www.signalshala.in
http://www.bbc.com/news/av/world-asia-india-38572142/mumbai-school-helps-young-roadside-sellers
http://www.firstpost.com/india/watch-how-signal-shala-is-bringing-street-children-to-school-3452572.html