गुन्हे वृत्त मुंबई

चाकूच्या धाकावर रेल्वे प्रवाशांना लुटणारा अट्टल चोरट्याला ठोकल्या बेड्या ; 12 इंच लांब चाकू जप्त ; अनेक गुन्ह्यांची होणार उकल

मुंबई :  चाकूचा धाक दाखवून रेल्वे प्रवाशांना लुटणाऱ्या अट्टल मोबाईल चोरट्याला 9 सप्टेंबर 2018 रोजी सकाळी 9:45 वाजता बेड्या ठोकण्यात आल्या. ही उत्तम कारवाई वांद्रे लोहमार्ग पोलिसांनी वांद्रे टर्मिनस येथे केली. कारवाईदरम्यान पोलिसांनी चोरलेला मोबाईल व चाकू जप्त केला आहे. या चोरट्याला न्यायालयात हजर केले असता 11 सप्टेंबर 2018 पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या आरोपीने दोन दिवसांपूर्वी बोरिवली लोहमार्ग पोलीस ठाण्याच्या एका प्रवाशाला चाकूचा धाक दाखवून मोबाईल पळवला होता.
वांद्रे टर्मिनस येथील फलाट क्र.६ वर आलेल्या अप सौराष्ट्र एक्सप्रेसच्या जनरल डब्यातील प्रवासी जमाल अहमद मोहमद मुस्तकीम खान (18, रा. कुर्ला कोर्ट हरिमशिदचे जवळ कुर्ला,(प) मुंबई) याला अजय प्रकाश दोडी ऊर्फ जितू उर्फ डांबर (30, रा. नँशनल पार्कच्या समोरील फ्लाँय ओव्हर खाली फुटपाथ, बोरिवली पूर्व, मुंबई) याने चाकूचा धाक दाखवून 9 हजार रुपयांचा विवो कंपनीचा मोबाईल पळवला. त्यावेळी जमालने आरडाओरड केला असता तेथे कर्तव्यावर असलेल्या वांद्रे लोहमार्ग पोलिसांनी अजयला घेरले. प्रवाशांच्या मदतीने पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे 12 इंच लांब चाकू सापडला. चोरलेला मोबाईल जप्त करून वांद्रे लोहमार्ग पोलिसांनी (गु.र.क्र. 2295/18) भादंवि कलम 392 सह भारतीय हत्यार कायदा कलम 4, 25 सह महाराष्ट्र पोलीस कायदा 37(1) 135 नुसार गुन्हा दाखल करून अजय प्रकाश दोडी ऊर्फ जितू उर्फ डांबर याला अटक केली.
अजय याने दोन दिवसांपूर्वी बोरिवली लोहमार्ग पोलीस ठाण्याच्या एका प्रवाशाला चाकूचा धाक दाखवून मोबाईल पळवला होता. या प्रकरणी बोरिवली लोहमार्ग पोलीस ठाण्यात (गु. र. क्र. 3575/2018) भादंवि कलम 392 नुसार गुन्हा दाखल असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
या गुन्हेगाराला वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनीलकुमार जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक खरमाटे, पोशि नितीन माने, पोशि मनोहरे, पोशि चव्हाण, पोशि शिंदे आदी पोलीस पथकाने अटक करण्यात व गुन्ह्यांची माहितीचा शोध घेण्यास उत्तम कामगिरी केली.

तपासादरम्यान अजयच्या गुन्ह्यांची समजलेली कुंडली

अजय प्रकाश दोडी ऊर्फ जितू उर्फ डांबर हा पोलीस रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर खालील लोहमार्ग पोलीस व मुंबई शहर पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल आहेत.

1. अंधेरी लोहमार्ग पोलीस ठाणे
गु.र.नं.52/16 कलम 379 भादंवि

2. बोरिवली लोहमार्ग पोलीस ठाणे
गु. र. क्रं. 2563/2017 कलम 379 भादंवि

मुंबई शहर पोलीस ठाण्यात दाखल गुन्हे

1. कस्तुरबा पोलीस ठाणे
174/2010,कलम 380,454 भादंवि.

2. दहिसर पोलीस ठाणे
गु.र.नं. 468/2017 कलम 379,भादवि, भाहका.4/25 प्रमाणे गुन्हे दाखल असून सदर गुन्हेत शिक्षा भोगलेली आहे.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!