डोंबिवली : बेटी बचाव” असा फक्त संदेश न देता ग्रामीण भागातील गरीब गरजू कुटुंबातील लेकींना प्रत्येकी 11000/-रुपये देऊन कन्यादान करण्याचा वसा घेऊन समाजकार्य करणारे आजदे गाव ओंकार नगर, येथील सिध्दिविनायक मित्र मंडळाचा यंदा अकरावा गणेशोत्सव……
विसर्जन मिरवणूकीने वाजत गाजत बाप्पाला निरोप द्यायची परंपरा, परंतू आता गणपती बाप्पाचे धुमधडाक्यात आगमन सोहळ्याच्या मिरवणूकीने स्वागत करण्याची नवीन चढाओढ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमध्ये सुरु झाली आहे. दशकपूर्तीच्या आनंदात आगळ्यावेगळ्या शाही थाटात आज या मंडळाच्या गणरायांचा आगमन सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. निवासी विभातून गणरायांची मिरवणूक ढोलताशांच्या गजरात व झगमगीत रोषणाईत आजदेगावाकडे निघाली.
शिवसेना शहरप्रमुख व नगरसेवक राजेश मोरे , तात्या माने ,नगरसेविका प्रमिला पाटील,मंडळाचे अध्यक्ष निखील पाटील , व सल्लागार बंडूशेठ पाटील यामान्यवरांच्या हस्ते गणरायांचे पूजन करुन आगमन सोहळ्यास प्रारंभ करण्यात आला. यंदा मंडळातर्फे गणेशोत्सव काळात नाविन्यपूर्ण छायाचित्रण व चलचित्रण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून शंभरावर नागरिकांनी यात भाग घेऊन उत्स्फुर्त प्रतिसाद दिला आहे.