डोंबिवली :- दि. ०९ ( शंकर जाधव ) डिझेल व पेट्रोलचे वाढते भाव व वाढती महागाईचा निषेध करण्यासाठी कॉग्रेसह डाव्या पक्षांनी व मनसेने डोंबिवली बंदचे आवाहन केले आहे. सर्व रिक्षा संघटनांनीनही या बंदसाठी पाठिंबा दिला असून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही या बंदला जाहीर पाठिंबा दिल्याचे पत्र काढल्याने कॉग्रेस कार्यकर्ते खुश झाले आहेत.
सोमवार 10 सप्टेंबर रोजी भारत बंदचे आवाहन करण्यात आले आहे. डोंबिवलीत कॉग्रेस आघाडीची फार ताकत नाही. आता मनसेने या बंदला पाठिंबा दिल्याने कॉग्रेस कार्यकर्ते खुश झाले आहेत. कॉंग्रेस प्रतिनिधी तथा माजी नगरसेवक संतोष केणे म्हणाले, अखिल भारतीय कॉंग्रेस पार्टीचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी भारत बंदची हाक दिली आहे. कॉंग्रेस आघाडीच्या सत्तेत शक्य होईल इतक्या भावात तुरडाळ आणि पेट्रोलचे भाव ठेवले होते. मात्र आज आंतरराष्ट्रीय मार्केट मध्ये तुरडाळचे भाव कमी असूनही आज लोकांना तुरडाळ महाग मिळत आहे. जनतेची फसवणूक केली जात आहे. मोदी सरकारमध्ये नोटबंदीमुळे १०० जन मृत्युमुखी पडले. नोटबंदीचा फटक्यामुळे अनेकजण बेरोजगार झाले. हे सरकारने कोटी लोकांना नोकऱ्या देऊ असे सांगितले होते. मात्र किती जणांना नोकऱ्या दिल्या ? असा प्रश्न जनता विचारत आहे. त्यामुळे कॉंग्रेस सरकार बरे होते असे आज जनता म्हणत आहे.उद्याच्याबंदमुळे कोकणात निघालेल्या कोकनवासीयांची पंचायत होणार आहे. उद्याच्या बंद मधून कोकणला वगळावे असे आवाहन कोकणवासी करत आहेत.