
कोविंद शुक्रवारी आपल्या युरोप दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी चेक प्रजासत्ताक येथील व्यावसायिक क्रायक्रमात सहभागी झाले होते. ते म्हणाले, की कंपन्यांनी संयुक्त उद्योगाच्या मदतीने देशी आणि जागतिक बाजारपेठेत संरक्षण उद्योगाच्या वाढत्या गरजांची पूर्तता करावी.
प्रागमध्ये प्रतिनिधीमंडळाच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. राष्ट्रपती कोविंद यांनी भारतीय संरक्षण उद्योगाच्या वाढत्या गरजांची पूर्तता करण्यासाठी भारत–चेक प्रजासत्ताकमधील कराराचेही महत्त्व विषद केले. बैठकीनंतर जारी करण्यात आलेल्या निवदेनाद्वारे दोन्ही देशांनी सर्व प्रकारच्या दहशतवादाविरोधात संयुक्तरीत्या लढा देण्याचे व सहकार्य करण्याचेही मान्य केले आहे.