गुन्हे वृत्त मुंबई

१५०० गुंतवणूकदारांची २५ कोटी रुपयांची फसवणूक क्युरकी टेक्नोलॉजीच्या सीईओ, व्हाईस प्रेसिडंटला ठोकल्या बेड्या ; फसवणूक झालेल्यांनी साकीनाका पोलिसांशी संपर्क साधावा

मुंबई  : १० टक्के व्याजाचे आमिष पैसे गुंतवलेल्या १५०० हून अधिक नागरिकांची २५ कोटी रुपयांची फसवणूक करणाऱ्या सीईओ सुमीत शर्मा (३०) व व्हाईस प्रेसिडंट सुमाईल खलील खान ऊर्फ समीर (३४) यांना ७ सप्टेंबर २०१८ रोजी अटक करण्यात आली आहे. ही उत्तम कारवाई साकीनाका पोलिसांनी केली असून, या आरोपींना १७ सप्टेंबर २०१८ पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या कंपनीत गुंतवणूक केलेल्या नागरिकांनी साकीनाका पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
साकीनाका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अंधेरी-कुर्ला मार्गावर सागर टेक प्लाझा इमारतीत क्युरिक टेक्नोलॉजी प्रा. लि. कंपनीचे आलीशान कार्यालय थाटण्यात आले होते. पैसे गुंतवल्यास १० टक्के व्याजदर देण्याची जाहिरात सोशल मीडिया, बुकलेट, वेबसाईटद्वारे करण्यात आली. गुंतवणूकदारांना पैसे गुंतवण्यास भाग पाडण्यासाठी चांगल्या पगाराची नोकरी देऊन अनेकांना कंपनीत रुजू करण्यात आले. 10 टक्क्यांच्या आमिषाला बळी पडून 1500 हून अधिका गुंतवणूकदारांनी कंपनीत पैसे गुंतवले. त्या गुंतवणूकदारांशी ३ महिन्यांचा करार करून कर्मचारी आरटीजीएस, एनएफटीद्वारे पैसे गुंतवण्यात सांगत.
मार्च २०१७ ते जुलै २०१८ दरम्यान गुंतवणूकदारांना दरमहा व्याज मिळत होते. मात्र जुलै महिन्यांपासून व्याज मिळणे बंद झाल्याने गुंतवणूकदारांनी साकीनाका येथील क्युरिक टेक्नोलॉजी प्रा. लि. कंपनीशी संपर्क साधला असता, उडवा उडवीची उत्तरे मिळू लागली. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच गुंतवणूकदारांनी साकीनाका पोलीस ठाणे गाठले. फसवणूक प्रकरणी पोलिसांनी ३ सप्टेंबर रोजी (गु. र. क्र. 585/18) भादंवि कलम ४०६, ४०९, ४२०, १२०(ब) नुसार गुन्हा दाखल केला. तपासादरम्यान पोलिसांनी क्युरकी टेक्नोलॉजीचे सीईओ सुमीत शर्मा (३०) व व्हाईस प्रेसिडंट सुमाईल खलील खान ऊर्फ समीर (३४) यांना काल अटक केली.
सदर कारवाई परिमंडळ १० चे उपायुक्त नवीनचंद्र रेड्डी, सहाय्यक पोलीस आयुक्त मिलिंद खेतले, वपोनि किशोर सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि प्रवीण माने, पोनि सुनील माने, सपोनि रौफ शेख, पोउनि अभिषेक पाटील यांनी पोलीस पथकाच्या मदतीने केली.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

नवी मुंबई

error: Content is protected !!