
डोंबिवली : इंधनवाढी आणि पेट्रोलवाढी विरोधात पुकारलेल्या बंदमध्ये डोंबिवलीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने बैलगाडीतुन मोर्चा काढून मोदी सरकारच्या निषेध नोंदविला. मनसे उपाध्यक्ष राजेश कदम, जिल्हा अध्यक्ष प्रकाश भोईर, नगरसेविका सरोज भोईर, यांसह प्रल्हाद म्हात्रे, समीर जगे आदी अनेक पदाधिकारी सहभागी झाले होते.यावेळी इंदिरा चौकात मनसेचा मोर्चा काढताना राजेश कदम यांनी मोदी सरकार आश्वासन कधी पूर्ण करणार असा प्रश्न उपस्थित केला.दरम्यान दुकानदार आणि रिक्षाचालकांनी बंद ला प्रतिसाद दिल्याबद्दल जनतेचे आभार मानले.यावेळी इंदिरा चौकात मोदी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.