कोकण

नॕशनल युनियन जर्नालिष्ट महाराष्ट्रच्या रायगड जिल्हा अध्यक्षपदी गणेश म्हात्रेंची निवड

पेण दि. ( प्रतिनिधी ) नॕशनल युनियन अॉफ जर्नालिष्ट (इंडिया ) नवी दिल्ली या राष्ट्रीय स्तरावरील मान्यता प्राप्त पत्रकार संघटनेच्या महाराष्ट्र प्रदेशच्या रायगड जिल्हा अध्यक्षपदी जेष्ठ पत्रकार व सा. लोकप्रतिनिधीचे संपादक श्री गणेश धर्माजी म्हात्रे यांची निवड झाली आहे .

राष्ट्रीय स्तरावरील पत्रकार संघटनेचे महाराष्ट्र राज्य प्रदेश अध्यक्ष डॉ. उदय जोशी यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी मुंबईत पार पडलेल्या कार्यकारणीच्या बैठकीत रायगड , पालघर , कोल्हापूर आणि जळगाव जिल्हा अध्यक्षांची निवड करण्यात आली .
दैनिक कोकण सकाळचे पेण तालुका प्रतिनिधी , नवनगर दैनिकामध्ये उपसंपादक , दैनिक गांवकरीचे प्रतिनिधी आणि स्वतःचे मालकीचे लोकप्रतिनिधी साप्ताहिक अशी गेली बावीस वर्षे गणेश म्हात्रे यांची वृत्तपत्र क्षेत्रातील वाटचाल आहे .

देशभरातील पत्रकारांचे नेतृत्व करणाऱ्या नॕशनल युनियन अॉफ जर्नालिष्ट (इंडिया ) नवी दिल्ली या संघटनेची मान्यता प्राप्त असलेल्या महाराष्ट्र प्रदेश संघटनेचे सदस्यत्व रायगड जिल्ह्यातील पत्रकारांनी स्विकारुन राष्ट्रीय प्रवाहात सामील व्हावे असे आवाहन नवनिर्वाचीत जिल्हा अध्यक्ष गणेश म्हात्रे यांनी केले आहे .

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

नवी मुंबई

error: Content is protected !!