महाराष्ट्र

डॉल्बी कोण बंद करतंय बघतोच : उदयनराजे

सातारा : साताऱ्यात दहीहंडीचा उत्साह शिगेला पोहोचला असून विविध ठिकाणी गोविंदा पथक दहीहंडी फोडत आहेत. डॉल्बीच्या आवाजावरुन वाद रंगलेले असताना खासदार उदयनराजे यांनी आवाज वाढवला आहे. ‘डॉल्बी कोण बंद करतंय हे बघतोच’ असं म्हणत उदयनराजेंनी आव्हान दिलं आहे. ‘दहीहंडीचे कार्यक्रम सुरु आहेत. यात वाजणारे डॉल्बी कोण बंद करतंय हे बघतोच.

दहीहंडी किंवा गणपती उत्सव हे लोकांचे महत्त्वाचे सण असून डॉल्बीच्या आवाजावर पोलिसांनी बंधन घालू नयेत’ असंही उदयनराजे म्हणाले. ‘डॉल्बी वाजवणारच. मग गुन्हे दाखल झाले तरी बेहत्तर. ये तो अभी ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है. डॉल्बी कोण बंद करतंय बघूच.
डॉल्बीवर मीच बसणार आहे’ असं म्हणत उदयनराजेंनी कायद्याला जणू आव्हानच दिलं. मुंबईसह राज्यभरात दहीहंडी उत्साहात साजरी झाली. ठाण्यात मध्यरात्री मोठ्या उत्साहात कृष्ण जन्माष्टमीचा कार्यक्रम साजरा करण्यात आला.

यावेळी महिला भाविक भक्तांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.

About the author

Aapale Shahar

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

नवी मुंबई

error: Content is protected !!