भारत

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली गणरायाची आरती ; सामाजिक एकोपा जपन्याचे केले आवाहन

नवी दिल्ली , १३ : केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्री रामदास आठवले यांनी आज महाराष्ट्र सदनात गणरायाचे दर्शन घेतले व आरती केली.

सार्वजनिक गणेशोत्सव समितीच्यावतीने कोपर्निकस मार्गस्थित महाराष्ट्र सदनात आज गणरायाची
प्रतिष्ठापना झाली . गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी गणरायाचे दर्शन घेतले व त्यांनी गणरायाची व पूजा आरती केली.सहायक निवासी आयुक्त विजय कायरकर यांच्यासह अधिकारी व कर्मचारी, गणेश भक्त यावेळी मोठया संख्येने उपस्थित होते.

यावेळी श्री आठवले यांनी उपस्थिताना संबोधित केले.’सामाजिक एकता व बंधुभावाचा संदेश देणाऱ्या गणेशोत्सवाच्या माध्यमातून देशभर सामाजिक एकोपा निर्माण व्हावा’असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

नवी मुंबई

error: Content is protected !!