गुन्हे वृत्त मुंबई

वाहने चोरणाऱ्या टोळीचा केला पर्दाफाश ; 11 वाहनांसह 2 कोटींची मालमत्ता जप्त, मुंबईतील 7 गुन्हे उघडकीस

मुंबई :  मुंबई, पालघर, ठाणे, गुजरात, वापी आदी ठिकाणांहून वाहने चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात आला आहे. ही उत्तम कामगिरी मुंबई गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या मालमत्ता कक्षाने केली.

टोळीकडून चोरी केलेली 11 वाहने व 31 टन कॉपर रॉड अशी एकूण 2 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. या टोळीतील एक म्होरक्या उत्तर प्रदेश, प्रतापगड येथील टोळीचा मास्टर माईंड असल्याचे तपासात समोर आले आहे. या मास्टर माईंडसह अटक करण्यात आलेल्या आरोपीला न्यायालयात हजर केले असता 17 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

मुंबईत वाढणाऱ्या वाहन चोऱ्यांना रोखण्यासाठी मुंबई गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या मालमत्ता कक्षाचे पथक तपास करत होते. तपासादरम्यान पोलिसांनी हजरतअली फकरुद्दीन खान (32) व अयुबअली मासुमअली शेख ऊर्फ गुड्डू ईलेक्ट्रीशन या वाहन चोरांना अटक करून 29 लाख रुपयांची 9 वाहने जप्त केली. चौकशीदरम्यान अटक आरोपींनी टोळीच्या म्होरक्यासह एका साथीदाराची माहिती दिली. त्यानुसार पोलिसांनी जोगेश्वरी परिसरात सापळा लावून मोसिन अशराफ बलोच याला सापळा लावून अटक केली. मात्र वाहन चोर टोळीतील म्होरक्या वसिम अहमद बशिर अहमद शेख याने कारमधून सुसाट धूम ठोकली.

तपासादरम्यान पोलिसांनी मासुमअली शेख ऊर्फ गुड्डू ईलेक्ट्रीशन याची चौकशी केली असता त्याने पालघर जिल्ह्यातील वालीव येथे 2 ठिकाणी दरोडा टाकून लॉरीसह 1 कोटी 81 लाख रुपयांचे 31 टन कॉपर गुजरात राज्यातील राजकोट येथे विकल्याची माहिती पोलिसांना दिली. त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी चोरलेला सर्व माल जप्त केला.

दरम्यान, फरार वसिम अहमद बशिर अहमद शेख याचा पोलीस शोध घेत असताना तो नागपाडा परिसरात येण्याची माहिती खबऱ्याने दिली. त्यानुसार पोलिसांनी 10 सप्टेंबर रोजी सापळा लावून वसिमला बेड्या ठोकल्या. वसिमच्या विरुद्ध मुंबईत विविध पोलीस ठाण्यात 13 गुन्हे दाखल असून त्यापैकी माटुंगा, विलेपार्ले, देवनार, दादर पोलीस ठाण्यांसह गुन्हे शाखेत दाखल असलेल्या 7 गुन्हे पोलिसांनी उघडकीस आणले. या टोळीचा पर्दाफाश करून 2 कोटी रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.

वाहन चोर टोळीचा पर्दाफाश करण्यात सहाय्यक पोलीस आयुक्त (डी / विशेष) संजय कदम, मालमत्ता कक्षाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील बाजारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि रहिमुतुल्ला सय्यद, पोनि धीरज कोळी, पोनि संतोष गायकर, सपोनि लक्ष्मीकांत साळुंखे, सपोनि सुनील माने, पोउनि अमित भोसले, सपोउनि नंदकुमार पवार, संतोष कोयंडे, राजेश सावंत, अंमलदार किरण जगताप, बाळासाहेब गणगे, अशोक सावंत, शैलेंद्र धनावडे, दत्तात्रय कोळ, सुनील कंगणे, प्रशांत भूमकर, महेश मोहिते, विश्वनाथ पोळ, संतोष औटे, आनंदा गेंगे, संदीप पाटील, चिंतामण इरनक, विनोद पदनम, शरद मुकुंदे, किरण जगदाेे, नितीन कवठाळे, राहुल पंडित, भीमराव गायकवाड, रमेश पाशी आदी पोलीस पथकाने मोलाची कामगिरी बजावली.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

नवी मुंबई

error: Content is protected !!