कल्याण : येथील कुणबी समाज प्रतिष्ठान, कल्याण शहर ह्या सामाजिक संस्थेने समाजातील कल्याणस्थित सर्व शिक्षक शिक्षिकांचा यथोचित सन्मान करता यावा या उद्देशाने ‘लॉर्ड सुमतींनाथ’ सभागृहात शिक्षकदिनाचा कार्यक्रम आयोजित केला होता.
समाजातील सर्व स्तरातील सुमारे 50 शिक्षक उपस्थित होते. यामधील बहुतांश शिक्षक हे तालुका किंवा जिल्हा स्तरावरील आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त गुणवंत शिक्षक असल्याची माहिती कार्यक्रमाचे सूत्रसंचालक श्री संतोष पाटील यांनी दिली.
संस्थेचे सदस्य असलेले श्री बी आर पाटील यांना मुंबईच्या मानाच्या ‘गुरू द्रोणाचार्य ‘ पुरस्काराने सन्मानित केल्याबद्दल त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
संस्थेच्या सर्व सदस्यांनी उपस्थिती लावत कार्यक्रमाची शोभा वाढविली.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान श्री बी.डी. पाटील यांनी भूषविले. ह्याप्रसंगी व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष एम.एस.पाटील, उपाध्यक्ष राम भोईर, सल्लागार संजय जाधव, नितीन पाटील, सुनील सांबरे, हिराजी धानके,रमेश भेरे, ए.के.पाटील श्री बी.बी.जाधव उपस्थित होते. प्रस्तावना श्री शैलेश सातवी यांनी केली तर प्रदीप विशे यांनी उपस्थितांचे आभार व्यक्त केले. सन्मानाला उत्तर म्ह्णून श्री मोकाशी सर, सौ. सपना पाटील मॅडम यांनी प्रातिनिधिक स्वरूपात आपले विचार मांडले.अशा प्रकारचे कार्यक्रम आयोजित करून शिक्षकांप्रति सामाजिक ऋण व्यक्त करण्याचा संस्थेचा हेतू असून यापुढे संस्थेच्या वतीने एखादा पुरस्कार प्रदान करण्याचा संस्थेचा मानस असल्याचे मत संस्थेचे सचिव श्री प्रमोद निपुर्ते यांनी व्यक्त केले.