शहापूर ( गितेश पवार) : शहापूर तालुक्यातील असलेले गावामधील खेड्या पाड्यातील नागरिकांनी आतापर्यंत अनेक तक्रारी महावितरण विभागाकडे केल्या होत्या तरीही त्यांच्याकडे आजपर्यंत महावितरण विभागाने दुर्लक्षच केले होते. शहापूर तालुक्यातील खेड्या पाड्यातील विद्युत खांब मोडकळीस आलेले असून ते काढून त्या ठिकाणी चांगल्या दर्जाचे खांब बसविण्यात यावेत तसेच विद्युत वाहक तारा असून ते सुद्धा जास्त प्रमाणात लोंबकलीस आलेले आहेत. त्या तारा सुद्धा नव्याने बसवण्यात याव्यात जेणेकरून लोकांना त्रास होणार नाही. तसेच शहापूर तालुक्यातील आपटे येथील टिकबाईचापाडा येथील कातकरिवाडीतील श्री.विष्णु पांडुरंग मुकणे यांच्या घरा शेजारी विद्युत वाहक खांब हा खूप वर्षा पासून असून तो मोडकळीस आलेले आहेत तसेच लेनाड (बु.) साईनगर (गावठा) येथील सुद्धा विद्युत खांब मोडकळीस आलेला आहे. त्यापासून इतर रहिवाशांना धोका निर्माण झाला आहे.ते कधीही पडू शकतात त्यामुळे जीवितहानी होण्याची दाट शक्यता आहे. तरीही आपण लवकरात लवकर लक्ष घालून त्या ठिकाणी नविन खांब बसविण्यात यावेत.
सदरहू अशी तालुक्यातील एकच समस्या नसून हजारो लोकांच्या समस्या आहेत.तरी त्या समस्यांसाठी आपण गावा खेड्यापाड्यातील विद्युत वाहक तारा व खांबांची पहाणी करून त्या ठिकाणी लवकरात लवकर नवीन खांब व विद्युत वाहक तारा बसवण्यात यावे तसेच प्रत्येक गावातील ट्रान्सफार्मा सभोवताली संरक्षक जाळी बसवण्यात यावी याबाबत शहापूर महावितरण विभागाचे कार्यकारी उपअभियंता कटकवार यांची भेट घेऊन गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेब युवा प्रतिष्ठान शहापूर तालुका अध्यक्ष सोमनाथ धिर्डे यांच्या वतीने निवेदन देण्यात आले यावेळी निवेदन देतांना सोबत प्रतिष्ठानचे सचिव गणेश चौधरी, सदस्य पंढरीनाथ ढमके आणि सलिम शेख उपस्थित होते.